Comunidade Land: ‘कोमुनिदाद’च्या जमिनीत अतिक्रमण

सांतआंद्रेतील प्रकार: आमदार वीरेश बोरकर यांनी सरपंचांसमवेत केली पाहणी
Comunidade Land
Comunidade LandDainik Gomantak
Published on
Updated on

सांतआंद्रेतील मंडूर कोमुनिदाद जमिनीत अतिक्रमण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आजोशी आणि मंडूर या दोन्ही गावांच्या सीमेवरील कोमुनिदाद जमिनीत बेकायदेशीररीत्या मातीचे भराव आणि दगड टाकून खासगी रहिवाशी प्रकल्पांसाठी रस्ता रुंदीकरण केले जात असल्याचे ‘आप’चे प्रदेश उपाध्यक्ष रामराव वाघ यांनी हा प्रकार उघडकीस आणला होता. याची दखल घेत आज आमदार वीरेश बोरकर आणि आजोशी -मंडूरचे सरपंच प्रशांत नाईक यांनी तेथे जाऊन निरीक्षण केले.

Comunidade Land
Kala Academy: कला अकादमीच्या सभागृहाचा भाग कोसळणे हे सरकारच्या भ्रष्टाचाराचेच एक उदाहरण; विजय सरदेसाईंची टीका

वाघ यांनी काल पठारावर जाऊन बेकायदेशीररीत्या सुरू असलेल्या कामासंदर्भात विधान केले होते. नगर नियोजन, कोमुनिदाद, जिल्हाधिकारी आणि वन खात्याने यात हस्तक्षेप करण्याची मागणी वाघ यांनी केली होती.

काम थांबवण्याची नोटीस पंचायतीने काढून देखील खुलेआमपणे काम सुरूच असल्याचे वाघ यांनी निदर्शनात आणून दिले होते. मुख्य म्हणजे कोमुनिदाद जमिनीत रस्ता बेकायदेशीरीत्या रुंद करण्यात आला आहे.

येथे खासगी वनक्षेत्र असूनही हा प्रकार घडत आहे, कारण पठारावर बिल्डर लॉबीने जमिनी विकल्या असून त्यांच्या प्रकल्पांसाठी हा रस्ता केला जात असल्याचा आरोप वाघ यांनी केला होता.

Comunidade Land
Tomato Rate : टोमॅटो दरवाढ विक्रेत्यांच्या पथ्यावर!

विधानसभेत विषय मांडणार !

स्थितीचा आढावा घेण्यासाठी आज आमदार वीरेश बोरकर आणि आजोशी-मंडूरचे सरपंच प्रशांत नाईक येथे पोहोचले. नगर नियोजन मंत्री विश्वजित राणे यांनी कोमुनिदाद जमिनीसंदर्भात 500 कोटी रुपयांचा घोटाळा होत असल्याचे ट्विट केले होते.

मंडूर कोमुनिदाद जमिनीत सुरू असलेला प्रकार देखील याचा भाग असावा असा संशय आहे. परंतु मंत्री राणे केवळ ट्विट करतात पुढे काहीही करत नाहीत. हा विषय आता विधानसभेत मांडणार आहे, असे बोरकर यांनी स्पष्ट केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com