Missing Case Dainik Gomantak
गोवा

खेळता खेळता रस्ता चुकल्याने थिवीत तीन मुलं बेपत्ता; कोलवाळ पोलिसांनी 40 मिनिटात लावला शोध

Colvale Police: रस्ता चुकल्याने ती मुले बेपत्ता झाल्याची माहिती मिळाली आहे

Ganeshprasad Gogate

Colvale Police: थिवी येथील गणेश मंदिराजवळ खेळत असताना बेपत्ता झालेल्या 3 मुलांना शोधून काढण्यात पोलिसांना यश आलंय.

पोलीस इन्स्पेक्टर विजय राणे यांच्या नेतृत्वाखाली कोलवाळ पोलिसांनी बेपत्ता झालेली 5 वर्षांची दोन जुळी मुले आणि 8 वर्षांच्या एका मुलीला शोधून काढत पालकांच्या हवाली केलंय. ही मुले खेळत असताना रस्ता चुकल्याने बेपत्ता झाल्याची माहिती मिळाली आहे.

या घटनेसंबंधी मिळालेली माहिती अशी की, थिवी येथील गणेश मंदिराजवळ खेळणाऱ्या ३ मुली अचानक गायब झाल्याचा फोन पणजी येथील पोलीस नियंत्रण कक्षाला गुरुवारी सकाळच्या सुमारास आला. पोलिसांनी घटनेची त्वरित दाखल घेत कोलवाळ पोलीस स्टेशनला सर्व माहिती पुरवली.

कोलावळ पोलीस इनस्पेक्टर विजय राणे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक रोहन मडगावकर यांच्यासोबत पोलीस दलातील सदा परब, संदिप मलिक, निखिल नाईक आणि एचसी रुपेश कोरगावकर, शिल्पा शेटगावकर तसेच पीसीआर व्हॅन आणि पिंक फोर्स घटनास्थळी रवाना झाले.

दरम्यान मंदिरानजीकच्या भागात पोलिसांनी शोध कार्य सुरु केल्यावर हरवलेल्या मुली थिवी-धानवाच्या आजूबाजूच्या घनदाट झाडीमध्ये सापडल्या. सध्या या मुली सुखरूप असून पोलिसांनी त्यांना त्यांच्या कुटुंबियांकडे सुपूर्द केलेय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT