Colvale Jail Dainik Gomantak
गोवा

Colvale Jail: आता कैद्यालाही पाहिजे सरकारी नोकरी!

चांगल्या वर्तणुकीची हमी : पुन्हा गुन्हा नाही; नाव कमवून चांगल्या पदावर जाण्याची इच्छा

गोमन्तक डिजिटल टीम

Colvale Jail गोव्यात बेरोजगारी मोठ्या प्रमाणात असल्याचे अहवाल अधूनमधून येतात. सरकारी नोकऱ्यांसाठी तरुणांची अक्षरश: झुंबड उडालेली दिसते. सरकारी नोकऱ्यांसाठी तरुण राजकारण्यांच्या वळचणीला जातात, इथपर्यंत ठीक आहे.

पण जर कैदीच सरकारी नोकऱ्यांची मागणी करू लागले तर? हो, असे घडलेय. कोलवाळ जेलमधील एका कैद्याने चक्क सरकारी नोकरीची मागणी केलीय.

त्याचे झाले असे की, कैद्यांनी जेलमध्ये पाच दिवसांच्या गणपतीचे पूजन केले आहे. याचे वृत्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांना प्रतिक्रिया देताना एका कैद्याने सरकारकडे नोकरीची मागणी केली. त्या कैद्याचे नाव विनेश फळदेसाई (रा.बाळ्ळी) असे आहे.

पत्रकारांशी बोलताना विनेश म्हणाला, लोकांच्या मनात कैदी म्हणजे गुंड अशी भावना असते. परंतु येथे कोणीच अजमल कसाबसारखे दहशतवादी नाहीत. मी कारागृह अधिकाऱ्यांनाही संदेश देऊ इच्छितो की, जर कोणाबद्दल कोणी काही सांगितले तर त्यावर चटकन विश्वास ठेवू नये.

येथे आम्ही सर्वजण एकोप्याने राहतो. भांडण करत नाही. अशा विचारांचे लोक मी कारागृहाबाहेरही पाहिलेले नाहीत. कैद्यांना उगाच वाईट म्हणता कामा नये. चूक घडत नाही, असे नाही. देवसुद्धा त्याला माफी करतो.

विनेशची गंभीर कृत्ये

  • जेलमधून बाहेर पडल्यानंतर सरकारी नोकरीची मागणी करणाऱ्या विनेशची कृत्ये गंभीर आहेत.

  • अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणात विनेश जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे.

  • पूर्वी विनेश सडा जेलमध्ये शिक्षा भोगत होता; पण तेथे गैरप्रकारांत गुंतल्याचे आढळल्याने त्याची रवानगी कोलवाळ कारागृहात केली.

  • विनेश हा बॉक्सर आहे. पॅरोलवर बाहेर आल्यानंतर तो बॉक्सिंग स्पर्धांमध्ये सहभागीही होतो.

  • गेल्या 12 वर्षांपासून तो जन्मठेपेची शिक्षा भोगतोय.

  • 14 वर्षांनंतर जन्मठेपेच्या शिक्षेचा फेरविचार केला जातो.

  • जर सर्व पातळ्यांवर कैदी पात्र ठरला, तरच त्याची सुटका करण्यात येते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs NZ 1st Test: अवघ्या दोन धावांनी हुकलं शतक, शुभमन गिलच्या नावावर नकोसा रेकॉर्ड! धोनी-विराटच्या यादीत समावेश

Couple Assault Viral Video: फोटो काढणाऱ्या जोडप्याला अश्लील शेरेबाजी, बेदम मारहाण, 8 अल्पवयीन मुले ताब्यात; मुंबईतील खळबळजनक व्हिडिओ व्हायरल

Agniveer Recruitment Data Leak: मोठी खळबळ! अग्निवीरांचा डेटा डार्क वेबवर विकायचा डाव? 14 वर्षांच्या मुलाला दिल्ली पोलिसांनी घेतलं ताब्यात

Railways New Rules: प्रवाशांनो सावधान! ट्रेनमध्ये मोठ्या आवाजात बोलणे पडू शकते महागात; न ऐकल्यास भोगावा लागू शकतो तुरुंगवास अन् दंड

Check Dam Construction: 3 तालुक्यांत 116 बंधाऱ्यांत पाणी अडवले; परिसरातील भूजल पातळीत वाढ झाल्याचा दावा

SCROLL FOR NEXT