Colvale Jail Dainik Gomantak
गोवा

Colvale Jail: कोलवाळ कारागृहात अचानक झाडाझडती, सहा मोबाईल जप्त; कारागृह प्रशासन व गोवा पोलिसांची संयुक्त कारवाई

Colvale Jail Raid: कारागृह प्रशासन आणि गोवा पोलिस यांच्या संयुक्त विद्यमाने कोलवाळ मध्यवर्ती कारागृहात शुक्रवारी संध्याकाळी अचानक व्यापक तपासणी मोहीम राबविण्यात आली.

गोमंतक ऑनलाईन टीम

म्हापसा: कारागृह प्रशासन आणि गोवा पोलिस यांच्या संयुक्त विद्यमाने कोलवाळ मध्यवर्ती कारागृहात शुक्रवारी संध्याकाळी अचानक व्यापक तपासणी मोहीम राबविण्यात आली. या कारवाईदरम्यान वेगवेगळे सेल आणि बॅरॅक्समधून सहा चालू स्थितीतील मोबाईल फोन आणि दोन मोबाईलचे सुटे भाग (सांगाडे) जप्त करण्यात आले.

थेट कारागृह महानिरीक्षकांच्या देखरेखीखाली राबविलेल्या आजच्या या मोहिमेत शिक्षा झालेले कैदी, न्यायाधीन कैदी आणि अतिसुरक्षा विभाग अशा एकूण चार मुख्य ब्लॉकमध्ये सखोल झडती घेण्यात आली. यावेळी जप्त केलेल्या मोबाईलमध्ये नोकिया, जिओ यांसारख्या बेसिक फोनसह अँड्रॉईड स्मार्टफोन्सचाही समावेश असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.पोलिस फौजफाट्यासह ही कारवाई करण्यात आली.

कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा

म्हापसा (प्रतिनिधी) : कोलवाळ मध्यवर्ती कारागृहात सुरू असलेले धक्कादायक प्रकार आणि कारागृहातील गैरकारभार म्हणजे कायदा व सुव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाल्याचे लक्षण असल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केला आहे.

आज ते माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना म्हणाले, की कारागृहातील कैदी आणि सत्ताधारी यांच्यात १०० टक्के साटेलोटे असून, तुरुंगात बसून कैदी फोन करतात आणि सत्ताधारी लोकप्रतिनिधी त्यांची पाठराखण करतात. त्यांना कारागृहात ड्रग्स व इतर साहित्य पुरविले जाते.

कर्मचाऱ्यांची सहा महिन्यांनी बदली

याच उपाययोजनांचा भाग म्हणून महिला कैदी असलेल्या विभागातील कर्मचाऱ्यांचा संपर्क मर्यादित ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी कारागृहात तैनात असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांची दर सहा महिन्यांनी बदली (रोटेशन) करावी, अशी लेखी मागणीही प्रशासनाने संबंधित विभागाकडे केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India vs Pakistan: एक-दोन नव्हे तर तब्बल 3 वेळा होऊ शकते भारत-पाकिस्तानची टक्कर! वर्ल्ड कप 2027 चं संपूर्ण गणित जाणून घ्या

Canacona Water Crisis: काणकोणमधील बंधारे अद्याप खुलेच; नद्या-नाले कोरडे, पाणीटंचाईचे संकट गडद

Municipal Election: पालिका प्रभागरचनेची घाई; सरकार-निवडणूक आयोग आमनेसामने, '24 तासांत काम कसे करणार?'

Goa Crime: 11 वर्षे शौचालयाखाली दडले होते खुनाचे रहस्य; खोदकामात सांगाडा सापडला, अखेर पुराव्याअभावी संशयित निर्दोष

Rohit Sharma: 'मला घरी बोलावलं, अर्धा तास माझ्यासोबत...' रोहित शर्माबाबत स्टार क्रिकेटपटूचं मोठं वक्तव्य; सांगितली संपूर्ण कहाणी

SCROLL FOR NEXT