Goa Drowning Dainik Gomantak
गोवा

Goa Drowning: आनंदाचा प्रवास ठरला अखेरचा! दूधसागर नदीत बुडून 4 IIT विद्यार्थ्यांचा मृत्यू; हसत्या-खेळत्या कुटुंबावर काळाचा घाला

Dudhsagar River Collem Drowning Incident: कुळे येथे असलेल्या दूधसागर नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेल्या चार आयआयटी विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याची अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली.

Manish Jadhav

पणजी: कुळे येथे असलेल्या दूधसागर नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेल्या चार आयआयटी विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याची अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली. मृतांमध्ये तीन सख्ख्या भावांचा समावेश असल्याचे प्राथमिक वृत्तातून समजते. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून शैक्षणिक क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वास्को येथील आयआयटीमध्ये शिक्षण घेणारे हे विद्यार्थी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी रेल्वेने वास्को (Vasco) ते कुळे असा प्रवास करुन आले होते. कुळेमधील मेतवाडा येथील दूधसागर नदीत हे विद्यार्थी पोहण्यासाठी उतरले होते. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने आणि प्रवाहाचा वेग जास्त असल्याने हे चारही विद्यार्थी पाण्यात अडकले आणि दुर्दैवाने त्यांचा बुडून मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाने घटनास्थळी धाव घेतली. काही तासांच्या शोधकार्यानंतर या चारही विद्यार्थ्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. या घटनेमुळे संपूर्ण गोव्यात खळबळ उडाली. हे विद्यार्थी नक्की कुठले आहेत आणि त्यांच्या सोबत आणखी किती मित्र होते, याबाबतची सविस्तर माहिती अद्याप पोलीस प्रशासनाकडून प्रतीक्षाधीन आहे.

दूधसागर नदी आणि परिसरातील जलस्त्रोत पर्यटकांसाठी आणि स्थानिकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहेत. मात्र, पावसाळ्याच्या तोंडावर किंवा नदीच्या खोल पात्रात योग्य खबरदारी न घेता पोहणे जीवावर बेतू शकते, हे या घटनेतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले. विद्यार्थी आणि तरुणांनी अशा ठिकाणी जाण्यापूर्वी सुरक्षेच्या सर्व नियमांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT