Goa College Student Boycott Class Dainik Gomantak
गोवा

Goa College Student Boycott: गोवा कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांचा वर्गावर बहिष्कार; जाणून घ्या काय घडले...

वर्षभरापासून प्रश्न प्रलंबित; मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना टाळले

Akshay Nirmale

Goa College Student Boycott Class: गोवा कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांनी कौन्सिल ऑफ आर्किटेक्चर अंतर्गत नोंदणी क्रमांक न दिल्याच्या निषेधार्थ वर्गावर बहिष्कार टाकला. जवळपास वर्षभरापासून हा प्रश्न प्रलंबित आहे.

विद्यार्थ्यांनी याबाबत वारंवार कॉलेज प्रशासनाकडे विचारणा केली होती, असे समजते. अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना जे आता उत्तीर्ण होऊन जाणार आहेत, त्यांना या नोंदणी क्रमांकाची खूप गरज असणार आहे. तो नोंदणी क्रमांक नसेल तर त्यांची अडचण होऊ शकते.

दरम्यान, आज सोमवारीदेखील विद्यार्थी प्राचार्यांकडे ही समस्या घेऊन गेले होते. तथापि, प्राचार्य विद्यार्थ्यांना भेटलेच नाहीत. COA कडे पाठपुरावा न केल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी कॉलेजवर केला आहे.

हा नंबर एकप्रकारे आर्किटेक्टच्या विद्यार्थ्यांसाठी सनद सारखा काम करतो. म्हणजे जर हा नोंदणी क्रमांक नसेल त्यांना स्वतंत्रपणे काम करता येत नाही. त्यांना एखाद्या आर्किटेक्टच्या हाताखाली काम करावे लागेल.

कॉलेजमध्ये एकूण 250 विद्यार्थी आहेत. त्यापैकी 50 हून अधिक विद्यार्थ्यांना हा नोंदणी क्रमांक मिळालेला नाही. शिवाय ज्यांना हा नंबर दिला गेला आहे तो देखील रँडम पद्धतीनुसार दिला गेला आहे. त्यामुळे टॉप टेनमधील विद्यार्थ्यांकडेही हा नंबर नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT