Collared Kingfisher Research Dainik Gomantak
गोवा

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

Goa Collared Kingfisher Research: ‘पॉप्युलेशन डायनॅमिक्स, डिस्ट्रिब्युशन अँड कन्झर्वेशन कन्सर्न्स ऑफ द कॉलर्ड किंगफिशर इन गोवा’ असे प्रकल्पाचे नाव असून, ‘टोडिरॅम्फस क्लोरिस’ या शास्त्रीय नावाने ओळखला जाणारा हा पक्षी पश्चिम किनारपट्टीवर आढळतो.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: गोव्याच्या किनारी भागात आढळणाऱ्या ‘कॉलर्ड किंगफिशर’च्या संवर्धनासाठी मिनरल फाउंडेशन ऑफ गोवा (एमएफजी) आणि गोवा बर्ड कन्झर्वेशन नेटवर्क (जीबीसीएन) यांच्या संयुक्त विद्यमाने संशोधन प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. या माध्यमातून पक्ष्याचे वितरण, लोकसंख्येतील बदल, अधिवास आणि संवर्धनासमोरील आव्हानांचा अभ्यास केला जाणार आहे.

‘पॉप्युलेशन डायनॅमिक्स, डिस्ट्रिब्युशन अँड कन्झर्वेशन कन्सर्न्स ऑफ द कॉलर्ड किंगफिशर इन गोवा’ असे प्रकल्पाचे नाव असून, ‘टोडिरॅम्फस क्लोरिस’ या शास्त्रीय नावाने ओळखला जाणारा हा पक्षी पश्चिम किनारपट्टीवर आढळतो. गेल्या दोन दशकांत गोव्यात त्याच्या दर्शनाच्या नोंदी झाल्याने त्याला राज्याच्या दृष्टीने विशेष संवर्धन महत्त्व प्राप्त झाले आहे.

नोंदी कळविण्‍याचे नागरिकांना आवाहन

स्थानिक नागरिक, मच्छीमार, पक्षीनिरीक्षक, छायाचित्रकार, निसर्गप्रेमी आणि किनारी भागातील रहिवाशांचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे प्रकल्पाचे प्रमुख संशोधक पराग रांगणेकर यांनी सांगितले. खारफुटी, खाड्या, कालवे किंवा अन्य किनारी भागांत कॉलर्ड किंगफिशर दिसल्यास त्याची माहिती संशोधन पथकाला देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT