Goa Weather| Goa Winter | Goa Beach Dainik Gomantak
गोवा

Goa Winter: राज्यात हुडहुडी कायम! पुढील 4 दिवस कसे राहणार तापमान? वाचा..

Goa Weather: राज्यात मागील काही भागात थंडीचा जोर मोठ्या प्रमाणात असून इलेक्ट्रीक गॅजेड, मोबाईलवर तापमानाचा पारा १५ अंश सेल्सिअस नोंद करण्यात येत आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: राज्यात पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्याची तीव्रता वाढल्याने मागील दोन-तीन दिवसांपासून हुडहुडी भरविणारी थंडी पडत आहे. सोमवारी १८ अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली. जी सामान्य तापमानाच्या तुलनेत ३.८ अंश सेल्सिअस तापमानाची घट नोंदविण्यात आली.

पुढील चार दिवस राज्यात थंडी कायम राहणार असून पारा १८ ते १९ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता गोवा वेधशाळेने वर्तविली आहे. राज्यात वाढती थंडी, रात्री आणि पहाटे पडणाऱ्या धुक्याच्या अनुषंगाने नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी.

घराबाहेर पडताना ऊबदार कपडे घालावेत. धुक्यामध्ये वाहन चालविताना योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. राज्यात मागील काही भागात थंडीचा जोर मोठ्या प्रमाणात असून इलेक्ट्रीक गॅजेड, मोबाईलवर तापमानाचा पारा १५ अंश सेल्सिअस नोंद करण्यात येत आहे.

अनेक ठिकाणी पाणथळ भागात तसेच घाटालगतच्या भागात थंडीचा प्रभाव अधिक आहे. वाढत्या थंडीमुळे सर्दी, खोकला, ताप येणे, त्वचा फुटणे आदी प्रकार वाढले असून नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहेत.

राज्यात पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्याच्या प्रभावामुळे थंडीचा जोर वाढला असून पुढील काही दिवस थंडी कायम राहणार आहे. पुढील चार दिवस किमान तापमानाचा पारा १८ ते १९ अंशांपर्यंत राहणार असून नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी.

- नहुष कुलकर्णी, संचालक, गोवा वेधशाळा

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

Viral Video: 'पोरांचं काय चाललंय?' एकाच बाईकवर सहा शाळकरी मुलांचा थरारक प्रवास; व्हिडिओ समोर येताच पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT