Winter Care Tips: हिवाळ्यात पार्लरचा खर्च वाचवा! चमकदार त्वचा आणि दाट केसांसाठी प्या 'हे' मॅजिकल सूप

Manish Jadhav

मटन पाया सूप

हिवाळ्याच्या दिवसात शरीराला उबदार ठेवण्यासाठी आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी 'मटन पाया सूप' (Mutton Paya Soup) हा एक उत्तम आहार मानला जातो.

Mutton Paya Soup | Dainik Gomantak

हाडांच्या मजबूती

मटन पाया सूपमध्ये 'कॅल्शियम' आणि 'फॉस्फरस' भरपूर प्रमाणात असते. यामुळे हाडे मजबूत होतात आणि सांधेदुखीचा त्रास कमी होण्यास मदत होते.

Mutton Paya Soup | Dainik Gomantak

रोगप्रतिकारशक्ती वाढवते

हिवाळ्यात सर्दी-खोकल्याचा त्रास वारंवार होतो. पाया सूपमधील पोषक घटक शरीराची रोगप्रतिकारशक्ती (Immunity) वाढवून आजारांपासून संरक्षण करतात.

Mutton Paya Soup | Dainik Gomantak

शरीराला नैसर्गिक उब मिळते

मटन पायाची तासीर गरम असते. थंडीच्या दिवसात हे सूप प्यायल्याने शरीरातील उष्णता टिकून राहते आणि थंडी वाजत नाही.

Mutton Paya Soup | Dainik Gomantak

सांधेदुखीवर गुणकारी

यात 'कोलॅजन' आणि 'ग्लुकोसामाइन'चे प्रमाण जास्त असते. जे सांध्यांमधील वंगण टिकवून ठेवण्यास आणि सांधेदुखीपासून आराम मिळवण्यास मदत करते.

Mutton Paya Soup | Dainik Gomantak

चमकदार त्वचा आणि केस

पाया सूपमध्ये असलेल्या अमिनो ॲसिड आणि कोलॅजनमुळे त्वचा तजेलदार होते आणि केसांचे आरोग्य सुधारुन ते दाट होतात.

Mutton Paya Soup | Dainik Gomantak

पचनशक्ती सुधारते

हे सूप पचायला हलके असते. यातील 'ग्लायसीन' नावाचे घटक पचनसंस्थेचे कार्य सुधारतात आणि पोटाचे विकार दूर ठेवण्यास मदत करतात.

Mutton Paya Soup | Dainik Gomantak

अशक्तपणा दूर होतो

जर तुम्हाला सतत थकवा जाणवत असेल, तर पाया सूप हा ऊर्जेचा उत्तम स्रोत आहे. हे शरीरातील रक्ताचे प्रमाण सुधारण्यासही मदत करते.

Mutton Paya Soup | Dainik Gomantak

150 वर्षांचं पोर्तुगीज वैभव अन् मराठ्यांचा स्वाभिमान, चिमाजी आप्पांच्या रणसंग्रामाची शौर्यगाथा सांगणारा 'वसईचा किल्ला'

आणखी बघा