Goa Winter
Goa WinterDainik Gomantak

Goa Weather Update: गोवा गारठला! पुढील चारही दिवस थंडीचे; पारा 18 ते 19 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता

Goa Winter: राज्यात कमाल आणि किमान तापमानातही घट नोंदविली असून सामान्य कमाल तापमानाच्या तुलनेत -१.५ अंश सेल्सिअस आणि किमान तापमानाच्या तुलनेत -३.५ अंश सेल्सिअसची नोंद केली आहे.
Published on

पणजी: राज्यात पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्याची तीव्रता वाढल्याने मागील दोन-तीन दिवसांपासून हुडहुडी भरविणारी थंडी पडत आहे. रविवारी यंदाच्या वर्षातील सर्वाधिक नीचांकी १७.१ अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली.

पुढील चार दिवस राज्यात थंडी कायम राहणार असून, पारा १८ ते १९ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता गोवा वेधशाळेने वर्तविली आहे. राज्यात कमाल आणि किमान तापमानातही घट नोंदविली असून सामान्य कमाल तापमानाच्या तुलनेत -१.५ अंश सेल्सिअस आणि किमान तापमानाच्या तुलनेत -३.५ अंश सेल्सिअसची नोंद केली आहे.

राज्यात वाढती थंडी, रात्री आणि पहाटे पडणाऱ्या धुक्याच्या अनुषंगाने नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी. घराबाहेर पडताना ऊबदार कपडे घालावेत. धुक्यामध्ये वाहन चालविताना योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, यापूर्वी ४ डिसेंबर १९७० रोजी नीचांकी १६ अंश सेल्सिअसपर्यंत पारा घसरला होता.

Goa Winter
Goa Winter: गोमंतकीयांनो काळजी घ्या! पारा खाली उतरणार; गोव्यासह उत्तर कर्नाटक, मध्य महाराष्ट्रात पडणार कडाक्याची थंडी

राज्यात यापूर्वी अनेकदा तापमानाचा पारा १६ अंशांवर घसरला आहे; परंतु पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांचा जोर वाढल्याने मागील काही दिवसांपासून गोव्यासह मध्य महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक आणि बेळगाव परिसरात थंडीची तीव्रता वाढली आहे. वाढत्या थंडीमुळे संसर्गजन्य आजार वाढले असून नागरिकांनी आरोग्यासंबंधी योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Goa Winter
Goa Weather: पारा घसरला! थंडीची लाट कायम, पूर्वेकडील वाऱ्यांमुळे दुपारच्या वेळीही घरांमध्ये गारवा

डिसेंबरमधील नीचांकी तापमान

२१ डिसेंबर - १७.१ अंश सेल्सिअस

१२ डिसेंबर - १७.५ अंश सेल्सिअस

२० डिसेंबर - १८ अंश सेल्सिअस

१९ डिसेंबर - १८.१ अंश सेल्सिअस

१३ डिसेंबर - १८.५ अंश सेल्सिअस

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com