Cold Dainik Gomantak
गोवा

राज्यात थंडीची चाहूल; पारा 24 अंशावर घसरला

घाटलगतच्या भागात गारवा वाढला

Ganeshprasad Gogate

Cold राज्यात पहाटे थंडी जाणवू लागली आहे. थंडीच्या चाहुलीमुळे आॅक्टोबर हीट आणि सातत्याने होणाऱ्या हवामानबदलांपासून काहीसा दिलासा मिळत आहे. राज्यात पहाटे थंडी जाणवत आहे.
पुढील काही दिवस राज्यातील तापमानात पुढील काही दिवस मोठे बदल घडण्याची शक्यता नसल्याने हुडहुडीचा अनुभव नागरिकांना घेता येणार आहे.

सध्या किमान तापमान 24 अंश सेल्सिअसपर्यंत घसरले आहे. घाटालगतच्या भागात सत्तरी, धारबांदोडा, मोले आणि राज्यातील बहुतांश भागात तीव्र थंडी जाणवत आहे. तर शहरी भागात तसेच किनारी भागात देखील अल्प प्रमाणात थंडीची चाहुल आहे.

सकाळी मोठ्या प्रमाणात दव आणि धुकेही पडत आहे. वातावरणातील बदलामुळे अनेकांनी उबदार कपड्यांचा वापर सुरू केला आहे. मॉन्सुनोत्तर लांबलेला पाऊस आणि यंदा सततच्या होणाऱ्या हवामान बदलातदेखील थंडीचे आगमन निर्धारित वेळेतच झाल्याचे हवामान अभ्यासकांचे मत आहे.

सामान्यतः नोव्हेंबरपासून हिवाळ्याला सुरूवात होते त्यामुळे नोव्हेंबरमध्ये राज्यात हुडहुडी भरवणारी थंडी पडेल. आज पणजी येथे कमाल ३३.४ अंश सेल्सिअस तर किमान २४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे.

पारा घसरणार 20 अंशांवर
काही दिवसांत थंडी अधिक वाढण्याची शक्यता आहे. घाटलगतच्या भागात सद्यस्थितीत अधिक प्रमाणात थंडी जाणवत आहे. थंडीचा अनुभव मोठ्या प्रमाणात नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात घेता येईल. त्यावेळी पणजीसहित किनारी भागातील किमान तापमान 20 अंशापर्यंत खाली जाण्याची शक्यता आहे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa News Live: ओपा जल शुद्धीकरण प्रकल्पाजवळ ट्रक दरीत कोसळला

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

SCROLL FOR NEXT