गोव्यातील 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बाबू गावकर याने यजमानांना मॉडर्न पेंटॅथलॉनमध्ये लेझर रन प्रकारात पहिले सुवर्णपदक मिळवून दिले होते, या खेळात राज्याला शुक्रवारी आणखी दोन ब्राँझपदके मिळाली. फोंडा क्रीडा संकुलात स्पर्धा झाली.
नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत असलेले कोलवाळ कारागृह पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. येथे घडलेल्या एका प्रकारामुळे कारागृह महानिरीक्षकांकडून चौघा कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे. कारागृहात कैद्यांना ‘रावणवध’ उत्सवासाठी फटाक्यांचा वापर करण्यास परवानगी दिल्याने कारागृहातील सहाय्यक अधीक्षक, दोन जेलर व एक सहाय्यक जेलर यांना निलंबित करण्यात आल्याचे समजतेय.
गोव्याच्या आग्वाद किल्लावर एक संग्रहालय उभारण्यात आले आहे, संग्रहालय गोव्याचा समृद्ध इतिहास आणि संस्कृती जतन करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल. 'आग्वाद इंटरएक्टिव्ह म्युझियम: गोवा - द लँड, द स्ट्रगल, द पीपल' अस या संग्रहालयाला नाव देण्यात आले असून, राज्याचे पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन करण्यात आले, असे अधिकृत निवेदनात म्हटले आहे.
नेटबॉल पुरुष संघाच्या अंतिम सामन्यात हरियाणा संघ विजयी, 33-22 च्या फरकात हरियाणा संघाने सुवर्णपदक प्राप्त केले.
कळंगुटमधील पबमध्ये महाराष्ट्रातील अहमदनगरमधून आलेल्या दोन पर्यटकांची लूट झाल्याची घटना घडली होती. याबाबत पर्यटकांनी गोवा पोलीस आणि सरकारवर नाराजी व्यक्त केली होती. मात्र पोलिसांनी सतर्कता दाखवत काही तासातच त्या पर्यटकांना लुटणाऱ्या दोघा दलालांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून पर्यटकांची चोरल्रली रोख रक्कम ताब्यात घेतलीय.
37 व्या राष्ट्रीय क्रिडा स्पर्धेच्या उद्घाटन समारंभावेळी अनुसूचित जमाती, ओबीसी आणि ख्रिस्ती समाजाचा अपमान करण्यासाठीच क्रिडामंत्री गोविंद गावडे, केंद्रिय मंत्री श्रीपाद नाईक आणि फ्रांसिस सार्दिन यांना स्वयंपूर्ण फेरीतून वगळले असा आरोप काँग्रेसच्या माध्यम विभागाचे प्रमूख अमरनाथ पणजीकर यांनी केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरुवारी (दि. 26) राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन झाले. फातोर्डा येथील जवाहरलाल नेहरु मैदानावर हा उद्घाटन समारंभ रंगला. यावेळी नरेंद्र मोदींनी केलेल्या भाषणात त्यांनी देशात गेल्या तीस दिवसांत झालेल्या कामांची यादी वाचली.
नारी शक्ती वंदन कायदा कायदा झाला.
- गगनयानशी संबंधित एक अत्यंत महत्त्वाची चाचणी यशस्वीरीत्या पार पडली.
- भारताला पहिली प्रादेशिक रॅपिड रेल्वे नमो भारत मिळाली.
- बेंगळुरू मेट्रो सेवेचा विस्तार.
- जम्मू-काश्मीरची पहिली विस्टाडोम ट्रेन सेवा सुरू झाली.
- या 30 दिवसांत दिल्ली-वडोदरा एक्स्प्रेस वेचे उद्घाटन झाले.
- भारतात G-20 देशांच्या खासदार आणि वक्त्यांची परिषद झाली.
- भारतात ग्लोबल मेरीटाईम समिट झाली, 6 लाख कोटी रुपयांचे करार झाले.
- इस्रायलमधून भारतीयांच्या मायदेशी परतण्यासाठी ऑपरेशन अजय सुरू करण्यात आले.
- 40 वर्षांनंतर भारत आणि श्रीलंकादरम्यान फेरी सेवा सुरू झाली.
- युरोपला मागे टाकत भारत 5G वापरकर्त्यांच्या बाबतीत जगातील टॉप-3 देशांमध्ये पोहोचला.
- अॅपलनंतर गुगलनेही मेड इन इंडिया स्मार्टफोन बनवण्याची घोषणा केली.
- आपल्या देशाने अन्न आणि फळ-भाजीपाला उत्पादनात नवा विक्रम केला.
- गेल्या 30 दिवसांत तेलंगणामध्ये 6 हजार कोटी रुपयांच्या सुपर थर्मल पॉवर प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले.
- छत्तीसगडच्या बस्तरमध्ये 24 हजार कोटी रुपयांच्या आधुनिक स्टील प्लांटचे उद्घाटन करण्यात आले.
- राजस्थानमध्ये मेहसाणा-भटिंडा-गुरदासपूर गॅस पाइपलाइनच्या एका विभागाचे उद्घाटन करण्यात आले.
- जोधपूरमध्ये नवीन विमानतळ टर्मिनल इमारत आणि आयआयटी कॅम्पसची पायाभरणी आणि उद्घाटन करण्यात आले.
- गेल्या 30 दिवसांत महाराष्ट्रात 500 हून अधिक कौशल्य विकास केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.
- काही दिवसांपूर्वी गुजरातच्या धोर्डोला सर्वोत्कृष्ट पर्यटन गावाचा पुरस्कार मिळाला होता.
- वीरांगना राणी दुर्गावती स्मारकाचे भूमिपूजन जबलपूरमध्ये झाले.
- हळद उत्पादक शेतकऱ्यांसाठी हळद उत्पादक मंडळ जाहीर.
- तेलंगणात केंद्रीय आदिवासी विद्यापीठाला मान्यता मिळाली.
मध्य प्रदेशमध्ये 2.25 लाख गरीब कुटुंबांना पीएम आवास योजनेअंतर्गत घरे मिळाली.
- या 30 दिवसांत पीएम स्वानिधी योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या 50 लाखांवर पोहोचली आहे.
- आयुष्मान भारत योजनेअंतर्गत 26 कोटी कार्ड बनवण्याचा टप्पा पार केला आहे.
- आकांक्षी जिल्ह्यांनंतर, देशात आकांक्षी गटांच्या विकासाची मोहीम सुरू झाली.
- गांधी जयंतीला दिल्लीतील एका खादीच्या दुकानात दीड कोटी रुपयांची विक्री झाली.
गोव्यात होत असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा उद्घाटन समारंभ गुरुवारी फातोर्डा येथील जवाहरलाल नेहरु मैदानावर रंगला. या समारंभाला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खास उपस्थिती होती. मोदीच्या हस्ते ज्योत प्रज्वलित केल्यानंतर राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेला अधिकृत सुरुवात झाल्याची मोदींनी घोषणा केली. या उद्घाटन समारंभात अनेक खुर्च्या रिकाम्या असल्याचा एक व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे.
कर्नाटकला पराभूत करुन गोवा पुरुष नेटबॉल टीमने फायनलमध्ये प्रवेश केला आहे. आज पाच वाजता हरियाणासोबत अंतिम सामना होईल.
सावर्डे आणि सांगेतील सेसा गोवाच्या ई-लिलाव खनिजमालाची वाहतूक करण्यास ट्रकवाल्यांचा नकार. वाहतूक दर वाढविण्याची ट्रकवाल्यांची मागणी.
अहमदनगर महाराष्ट्रातील दोघा पर्यटकांना कळंगुटमधील एका पबमध्ये लुटल्याची घटना समोर आली आहे. त्यांना मारहाण करुन त्यांच्याजवळचे पैसे आणि गुगल पेवरील पैसेही उकळले. पबमध्ये नेणारे आणि नंतर मारहाण करणारे बाऊन्सर परप्रांतीय असल्याची माहिती. सरकारने यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी पर्यटकांनी केली आहे.
आज (शुक्रवार) सकाळपासून तीन अपघातांची नोंद झाली आहे. थिवी गाडी चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने कर्नाटक नोंदणीकृत भाजीवाहू टेम्पो कांसाबोर्ड थिवी येथे उरतीवर रस्त्याबाजूला गेला. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही.
धारगळमध्ये दोन चारचाकींची आपापसात धडक बसली. यामध्ये कुणालाही इजा झाली नाही.
तर तिसऱ्या घटनेत, मालपे येथे महाराष्ट्रातील कारचा स्वयं अपघात झाला. भरधाव वेगात असलेली कार 15 मीटरवरून खाली कोसळली. यामध्ये कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून प्रवासी जखमी झाले आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांनी कारमधील सर्वांना बाहेर काढले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने दक्षिण गोव्यातील सात हॉटेल्सना कामकाज बंद करण्याची नोटीस बजावली आहे. हॉटेल्सकडे वैध परवाने नसल्याचे मंडळाने म्हटले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.