Goa Coconut Dainik Gomantak
गोवा

Goa Coconut: 'फलोत्पादन'तर्फे 65 हजार नारळांची विक्री! दर आवाक्यात येईपर्यंत विक्री करणार; फलोत्पादन महामंडळाच्या व्यवस्थापकांची माहिती

Goa Coconut price: राज्यात मागील महिन्याभरात नारळांच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. मध्यम आकाराचा नारळ ६० ते ७० रुपये प्रती नग दराने विकला जात होता

Sameer Amunekar

पणजी: राज्यात मागील महिन्याभरात नारळांच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. मध्यम आकाराचा नारळ ६० ते ७० रुपये प्रती नग दराने विकला जात होता, परंतु गोवा फलोत्पादन महामंडळाने चतुर्थीच्या तोंडावर सर्वसामान्यांना नारळाचा तुटवडा भासू नये, अल्प दरात नारळ मिळावा यासाठी ६५ हजार नारळांची विक्री केल्याचे गोवा फलोत्पादन महामंडळाचे व्यवस्थापक चंद्रहास देसाई यांनी सांगितले.

देसाई म्हणाले, चतुर्थीनंतर नारळाचा पाडा उतरलेला असेल, त्यामुळे मोठ्या प्रमाणात बाजारात नारळ उपलब्ध होतील. त्यामुळे आम्ही अनंतचतुर्थीपर्यंत आमच्या फलोत्पादन महामंडळाच्या केंद्रांवर नारळ विक्री सुरू ठेवणार आहोत. जर त्यानंतरही नारळांचा तुटवडा भासल्यास, दर आवाक्यात येत नसल्यास नारळ विक्री कायम ठेवावी का? याबाबत निर्णय घेण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

प्रत्येकी २५ हजार नारळ टप्प्याटप्याने विकले जात आहेत. पहिल्या टप्यातील २५ हजार नारळ अवघ्या चार दिवसांत विकले गेले. आता दुसऱ्या टप्प्यातील नारळ देखील दोन-तीन दिवसात विकले गेले आणि तिसऱ्या टप्प्यातील नारळ आता संपत आले असून नारळाच्या आकाराप्रमाणे ३८ आणि ४० रूपये प्रती नारळ दराने विक्री सुरू असून नागरिकांचा अतिशय उत्तम प्रतिसाद लाभत असल्याचे देसाई यांनी सांगितले.

खुल्या बाजारातही दरात घट

फलोत्पादनने नारळांची विक्री सुरू केल्यानंतर बाजारांत नारळांच्या दरात घट झाली आहे. छोटे नारळ मध्यम आकाराचे नारळ ४० ते ५० रूपये प्रती नग दराने विकले जात असून येत्या काळात नारळाच्या किमती आवाक्यात येण्याची शक्यता विक्रेत्यांकडून वर्तविण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Rain: 'चतुर्थी'काळात पावसाचे संकट! 4 दिवस 'यलो अलर्ट' जारी; जोरदार सरी कोसळण्याची शक्यता

बिहारचे मुद्दे आणि चेहरे; मतदारयादी शुद्धीकरण, व्होट-चोरीचा आरोप आणि लालूंचे 'जंगल राज'

Horoscope: गणपतीच्या आराधनेने होतील अडथळे दूर, तुमच्या राशीनुसार कोणते बदल आवश्यक? जाणून घ्या

Opinion: 'पार्सल संस्कृती'चा गैरवापर; युवा पिढी बर्बाद होण्यास वेळ लागणार नाही

Ganesh Festival In Goa: गोव्यात 1961 नंतर सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात, आज प्रत्येक गल्लीबोळात पाहायला मिळतो बाप्पाचा जल्लोष

SCROLL FOR NEXT