Goa Coconut Dainik Gomantak
गोवा

Goa Coconut Price: बाप्पांचे विसर्जन झाले, तरी नारळ अजून भडकलेलेच; चिबूड, तवशांचीही आवक वाढली

Goa Coconut Rates: राज्यात चतुर्थीपूर्वीपासून बाजारात नारळाचे दर भडकलेले असून आता काही प्रमाणात नारळांना मागणी कमी झाली आहे, तरीही दर अजूनही आवाक्यात आलेले नाहीत.

Sameer Panditrao

पणजी: राज्यात चतुर्थीपूर्वीपासून बाजारात नारळाचे दर भडकलेले असून आता काही प्रमाणात नारळांना मागणी कमी झाली आहे, तरीही दर अजूनही आवाक्यात आलेले नाहीत. नारळाचा भडका कायम असून मध्यम आकाराचा एक नारळ ४० रुपये दराने विकला जात आहे.

चतुर्थीनिमित्त हाच नारळ ५० ते ६० रुपये एक दराने विकला जायचा. राज्याबाहेरील नारळांची आवक वाढली आहे. त्यासोबतच फलोत्पादन महामंडळाद्वारे नारळ विकले जात असल्याने काही प्रमाणात बाजारात किंमतींवर अकूंश आल्याचे दिसत आहे, परंतु नारळाला मागणी असल्याने दर चढेच आहेत.

स्थानिक शेतकऱ्यांद्वारे पिकविण्यात येणाऱ्या पावसाळी भाज्या जसे दोडकी, भेंडी चिबूड आणि तवशी यांची देखील आवक वाढलेली असून बाजारात त्यांना मागणी देखील चांगली आहे. कोवळी तवशी १०० रुपये वाटा दराने विकली जात आहेत, तर एक चिबूड आकाराप्रमाणे १०० ते १५० रुपये प्रती नग दराने विकला जात आहे.

कांदे, बटाटे ५० रुपये किलो

पणजी बाजारात कांदे, बटाटे तसेच टॉमेटो प्रती किलो ५० रुपये दराने विकले जात आहेत. भेंडी ८० रुपये किलो, कारली ८० रुपये, कोबी आणि फ्लॉवर ६० रुपये प्रती नग, पालेभाज्या २० रुपये प्रती जुडी दराने विकले जात आहे.

बाजाराच्या तुलनेत फलोत्पादन गाळ्यांवरील भाज्या काहीअंशी स्वस्त आहेत. फलोत्पादनाच्या गाळ्यांवर प्रति किलो भेंडी ८४ रुपये, कोबी २१ रु., गाजर ४८ रु., चिटकी ६३ रु., बिन्स ७५ रु., कांदे २७ रु., बटाटे २९ रु., तर टॉमेटो ४७ रुपये प्रती किलो दराने विकले जात आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai-Goa Highway वर भीषण अपघात! भरधाव कारनं दोन अल्पवयीन मुलींना उडवलं, दोघींचीही प्रकृती गंभीर Watch Video

'धुरंधर' स्टाईल फायरींगनं हादरला पाकिस्तान! जैश-ए-मोहम्मदच्या बड्या कमांडरचा खेळ खल्लास; अज्ञात बंदूकधाऱ्यांनं काढला काटा VIDEO

VIDEO: जखमी चेहरा, पाठीवर रडणारी बहीण, पुराचा हाहाकार! नेपाळमधील 'तो' 50 सेकंदांचा व्हिडिओ व्हायरल; तुमचेही पाणावतील डोळे

नो बॉलनंतर 'फ्री हिट' नको, गोलंदाजाला दंड ठोठवावा! सुनील गावसकरांची मोठी मागणी

Terrorist Secret Communication: गुप्त संवादासाठी अश्लील संकेतस्थळांचा वापर, दहशतवाद्यांची नवीन कार्यपद्धती; सोशल मीडियाला शोधला नवीन पर्याय

SCROLL FOR NEXT