Goa Coconut Dainik Gomantak
गोवा

Goa Coconut Price: गोमंतकीयांसाठी खुशखबर! वर्षभराच्या महागाईनंतर ‘नारळ’ झाला स्वस्त; नागरिकांना दिलासा

Goa Coconut Rates: मागणी वाढलेली असतानाच नारळ उत्पादनात मोठी घट झाल्याने दर गगनाला भिडले होते. तसेच नारळ उत्पादनात सुमारे ४० टक्क्यांची घट नोंदवली गेली होती.

गोमन्तक डिजिटल टीम

डिचोली: वर्षभरापासून ‘भाव’ खात असलेला नारळ आता काहीसा स्वस्त झाला आहे. दैनंदिन आहारातील महत्त्वाचा घटक तसेच प्रत्येक धार्मिक तसेच शुभकार्यांत अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या नारळाच्या किमतीत ५ ते १० रुपयांनी घट झाली आहे.

गेल्‍या गणेश चतुर्थीच्या काळात नारळांचे दर मोठ्या प्रमाणात वाढले होते. ग्राहकांच्या कपाळावर आठ्या पडत होत्या. स्वयंपाकघरात नारळाचा वापर करताना गृहिणींनाही विचार करावा लागत होता. वाढलेल्या किमतीमुळे नारळाचा वापर मर्यादित स्‍वरूपात करावा लागत होता.

मागणी वाढलेली असतानाच नारळ उत्पादनात मोठी घट झाल्याने दर गगनाला भिडले होते. तसेच नारळ उत्पादनात सुमारे ४० टक्क्यांची घट नोंदवली गेली होती. चतुर्थीच्या काळात डिचोली बाजारात नारळांच्या दरात प्रतिनग १० ते १५ रुपयांनी वाढ झाली होती. मोठ्या आकाराच्या नारळांचे दर ७० ते ८० रुपयांपर्यंत तर मध्यम आकाराचे नारळ ४० ते ६० रुपयांपर्यंत पोहोचले होते.

दराबाबत..

गणेश चतुर्थीवेळी : मोठे नारळ ७० ते ८० रुपये प्रतिनग. मध्यम नारळ ४० ते ६० रुपये. सध्याचे दर : आकारानुसार दरात ५ ते १० रुपये कमी.

दर घटण्याची कारणे : यंदा नारळांचा ‘पाडा’ समाधानकारक. बाजारात वाढलेली आवक. पुरवठा सुरळीत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT