Goa Coconut Rates Dainik Gomantak
गोवा

Goa Coconut Price: बाप्पा पावला! नारळ 'स्वस्तात' उपलब्ध; गणेशचतुर्थीनिमित्त फलोत्पादनतर्फे सवलत

Goa Coconut Rates: चतुर्थीपर्यंत नारळ विक्री सुरू ठेवणार असल्याचे फलोत्पादन महामंडळाचे व्यवस्थापक चंद्रहास देसाई यांनी सांगितले. देसाई म्हणाले, चतुर्थीनंतर मोठ्या प्रमाणात बाजारात नारळ उपलब्ध होतील.

Sameer Panditrao

पणजी: राज्यात मागील महिन्याभरात नारळांच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. मध्यम आकाराचा नारळ ६० रूपये प्रती नग दराने विकला जात होता. परंतु गोवा फलोत्पादन महामंडळाने चतुर्थीच्या तोंडावर सर्वसामान्यांना अल्प दरात नारळ मिळावा यासाठी इतर राज्यातून नारळांची आयात करून ‘ना नफा ना तोटा’ तत्त्वावर आतापर्यंत ४० हजार नारळांची विक्री केली आहे.

चतुर्थीपर्यंत नारळ विक्री सुरू ठेवणार असल्याचे फलोत्पादन महामंडळाचे व्यवस्थापक चंद्रहास देसाई यांनी सांगितले. देसाई म्हणाले, चतुर्थीनंतर मोठ्या प्रमाणात बाजारात नारळ उपलब्ध होतील. राज्यातील नारळाचा पाडा पूर्ण झालेला असेल त्यामुळे चतुर्थीनंतर नारळ विकायचे की नाही याचा निर्णय नंतर घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

प्रत्येकी २५ हजार नारळ टप्प्याटप्याने विकले जात आहेत. पहिल्या टप्यातील २५ हजार नारळ अवघ्या चार दिवसांत विकले गेले. आता दुसऱ्या टप्प्यातील देखील संपत आले असून पहिल्यांदा ४० रूपये दराने नारळ विकले होते. आता दर कमी झाल्याने ३८ रूपये प्रती नग दराने फलोत्पादन महामंडळांच्या गाळ्यांवर नारळ विक्री सुरू असल्याचे चंद्रहास देसाई यांनी सांगितले.

खुल्या बाजारातही झाली दरात घट

फलोत्पादन महामंडळाने नारळांची विक्री सुरू केल्यानंतर आता बाजारांमध्ये देखील नारळांच्या दरात घट झाली आहे. छोटे नारळ ३० रूपये प्रती नग तर मध्यम आकाराचे नारळ ४० ते ४५ रूपये प्रती नग दराने विकले जात असून येत्या काळात नारळाच्या किंमती आवाक्यात येण्याची शक्यता विक्रेत्यांकडून वर्तविण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT