पणजी: गोव्याच्या नारळ आणि मीठ उत्पादकांच्या वतीने नुकतेच एक निवेदन ओल्ड गोवा ऑईल्स अँड फूडस् प्रा.लि.चे चेअरमन परेश शेटगावकर यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना सादर केले.
पारंपरिक गोमंतकीय वस्तूंच्या धोरणात्मक महत्त्वाविषयी, खास करून नारळावरील प्रक्रिया आणि मीठ उत्पादन यांकडे ठळकपणे लक्ष वेधण्याचा तसेच औद्योगिक साधनसुविधा, संशोधन पाठबळ मूल्य आधारीत व स्थानिक शेतकऱ्यांना, उत्पादकांना शाश्वत आर्थिक विकासासाठी राज्य सरकारचे पाठबळ देण्याचे आवाहन करणे, असे हेतू हे निवेदन मुख्यमंत्र्यांना सादर करण्याकडे होते.
या अनुषंगाने परेश शेटगावकर यांनी सांगितले की, नारळ आणि स्थानिक मीठ यासारख्या पारंपरिक वस्तूंचा आधुनिक विज्ञान आणि संशोधनाशी मेळ घालून गोव्याच्या समृध्द कृषी वारशाचा सन्मान करणे हे आमचे ध्येय आहे. गोव्यात स्थानिक शेतकऱ्यांना सक्षम करणे, स्थानिक पारंपरिक व्यवसायांचे जतन करणे आणि शाश्वत औद्योगिक विकासाला चालना देणे हा एक मजबूत परिसंस्था निर्माण करण्याचा आमचा उद्देश आहे, असे ते म्हणाले. स्थानिक कृषी आणि प्रक्रिया परिसंस्था बळकट करणे, असेही या निवेदनामागील वैशिष्ट्य होते, असे या पत्रकात म्हटले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.