Chief Minister Pramod Sawant on Goa Restrictions

 
Dainik Gomantak
गोवा

गोव्यातील निर्बंधांवर मुख्यमंत्र्यांचं सूचक विधान

तज्ज्ञ समितीच्या शिफारसी लक्षात घेऊन निर्णय घेणार असल्याची माहिती

दैनिक गोमन्तक

पणजी : गोव्यात निर्बंध लादले जाणार की नाही याबाबत सध्या चर्चांना उधाण आलं आहे. एकीकडे निर्बंध लादण्याची शिफारस तज्ज्ञांची समिती करताना दिसत आहे, तर दुसरीकडे राज्यातील हॉटेल व्यावसायिक मात्र निर्बंध लादण्याच्या विरोधात असल्याचं चित्र आहे. यातच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी निर्बंध (Goa Restrictions) लादण्याचा विचार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

तज्ज्ञ समितीने केलेल्या शिफारसीवर राज्य सरकार विचार करत असून आज (मंगळवारी) संध्याकाळी याबाबत बैठक घेतली जाणार आहे. त्यामुळे गोव्यातील निर्बंधांवर (Restrictions) मुख्यमंत्री नेमकी काय भूमिका घेतात याकडे सर्वाचंच लक्ष लागलं आहे. दरम्यान बुधवारी टास्क फोर्सची बैठक होणार आहे, सध्याची गोव्यातील स्थिती आणि त्यावर करायच्या उपाययोजना याबद्दल टास्क फोर्सच्या (Task Force) बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

गोव्यात सध्या ख्रिसमस (Christmas) आणि नववर्षाच्या निमित्ताने पर्यटकांची मोठी गर्दी आहे. समुद्रकिनारे गर्दीने फुलले असून हॉटेलही हाऊसफुल्ल झाली आहेत. यातच पर्यटकांकडून कोरोना प्रतिबंधात्मक नियमांना केराची टोपली दाखवली जात असल्याचं चित्र आहे. गोव्यात ओमिक्रॉन व्हेरिएंटचा पहिला रुग्ण सापडल्याने सरकारने कठोर पावलं उचलण्याची तयारी चालवली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

World Record: 1383 ध्वजांनी रचला इतिहास, न्यू जर्सीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! FIA कडून जागतिक विक्रमाची नोंद

Ponda Water Problems: फोंड्यात 15 दिवसांत पुरेसे पाणी मिळणार? जनता दरबारात सुभाष शिरोडकरांचा शब्द

Gold Mine Accident: "मदतीसाठी आक्रोश अन् चिखलाने माखलेले मृतदेह!" सोन्याची खाण ठरली मृत्यूचा सापळा; 30 जणांचा मृत्यू

Mandovi River Pollution: मांडवी नदी प्रदूषणावर हायकोर्टात सुनावणी; खाडी परिसरातील प्रत्येक आस्थापनाची तपासणी करण्याची सूचना

SCROLL FOR NEXT