pramod sawant | yuri alemao | rahul gandhi
pramod sawant | yuri alemao | rahul gandhi Dainik Gomantak
गोवा

... यामुळे राहुल गांधीचे दहशतवादाशी संबंध; CM सावंतांना काँग्रेसच प्रत्युत्तर

Pramod Yadav

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी नुकतेच केंब्रिजमध्ये ‘लर्निग टू लिसन इन द ट्वेन्टीफर्स्ट सेंच्युरी’ या विषयावर व्याख्यान दिले. भारतीय लोकशाहीवर हल्ला होत असून, त्यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांवर पाळत ठेवली जात आहे, असा गंभीर आरोप राहुल गांधींनी व्याख्यानात केला. यावरून भाजप राहुल गांधी यांच्यावर टीका करत आहे.

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी देखील राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे.

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सहा ट्विटची मालिका शेअर करत राहुल गांधींवर टीका केली आहे.

"राहुल गांधींचे केंब्रिज येथील भाषण ‘मेड इन चायना’ असल्याचे भासते, त्यांनी चीनचे कौतुक करत भारतावर टीका केली आहे. गांधींचे भाषण भारत आणि भारतीय लोकशाहीवर हल्ला आहे."

"राहुल गांधींचे दहशतवाद्यांशी संबंध आहेत आणि हे संबंध पुलवामा दहशतवादी हल्ल्याला 'कार बॉम्ब' असे संबोधल्यामुळे पुन्हा एकदा उघड झाले आहेत. राहुल आणि काँग्रेस या दोघांनाही पाकिस्तानबद्दल सॉफ्ट कॉर्नर आहे. गांधींचे वक्तव्य म्हणजे आपले शूर सैनिक आणि शहीदांचा अपमान आहे. राहुल यांच्या भाषणामुळे त्यांचे चीन आणि कम्युनिस्ट नेत्यांवरील त्यांचे प्रेम पुन्हा एकदा दिसून आले." अशा शब्दात मुख्यमंत्री सावंत यांनी राहुल गांधी यांच्या केंब्रिज येथील भाषणावर टीका केली.

दरम्यान, या टीकेला काँग्रेस नेते आणि विरोधीपक्षनेते युरी आलेमाव यांनी प्रत्युउत्तर दिले आहे. "केंब्रिज विद्यापीठात व्याख्यान देणे हे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासाठी पूर्णपणे त्यांच्या अभ्यासक्रमाबाहेरचे आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच राहुल गांधींच्या आजी व माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि त्यांचे वडील व माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची दहशतवाद्यांनी हत्या केल्यामुळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि राहुल गांधी यांचा दहशतवादाशी संबंध आहे."

ज्यांना दहशतवादाचे संकट झेलावे लागले तेच त्याची वेदना समजू शकतात. मी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना विनंती करतो की, ऐतिहासिक भारत जोडो यात्रेच्या समारोपाच्या दिवशी श्रीनगर-काश्मीरमध्ये राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांचे भाषण त्यानी पाहावे. हात से हाथ जोडो मोहिमेने भाजपला पुन्हा एकदा धडकी भरल्याचे दिसते, असा सणसणीत टोला विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी हाणला आहे.

मुख्यमंत्र्यांनी राहुल गांधी आणि त्यांच्या भाषणाची दिशाभूल करणारे सहा ट्विट पोस्ट करण्यास प्राधान्य दिले हे सर्वात दुर्दैवी असल्याचे आलेमाव यांनी म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vasco Extortion Case: खंडणीसाठी वास्कोच्या व्यावसायिकाचे अपहरण करणाऱ्या आरोपीला जन्मठेप

Goa Human Trafficking: गोव्यात कशी होते मानवी तस्करी, कोणती आमिष दिली जातात? डिजीपींनी दिली माहिती

Panaji PS Attack Case: पणजी पोलीस स्थानक हल्ला प्रकरणाची 17 जूनला सुनावणी

Goa Politics: लोकांचा भाजपविरोधातील राग व्यक्त, दोन्ही जागा जिंकण्याचा इंडिया आघाडी दावा

Yellow Alert In Goa: गोव्यात पुढील सहा दिवस पावसाची शक्यता, दोन दिवसांसाठी 'यलो अलर्ट'

SCROLL FOR NEXT