PM Modi And Pope Francis
PM Modi And Pope Francis Modi X Handle
गोवा

Pope Goa Visit: CM आशेवर पण 15 महिन्यांत काहीच केले नसल्याचा काँग्रेसचा आरोप, युरींच्या पत्राचा दिला संदर्भ

Pramod Yadav

Pope Goa Visit

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी 6 फेब्रुवारी 2023 रोजी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना पत्र लिहून पोप फ्रान्सिस यांच्या भारत भेटीदरम्यान गोवा भेटीचा समावेश व्हावा यासाठी कोणतीही कसर ठेवू नये, असे मुख्यमंत्र्यांना कळविले होते.

परंतू, डॉ. प्रमोद सावंत यांनी गेल्या 15 महिन्यांत काहीही केले नाही हे खरोखरच खेदजनक असून आता पोप गोव्याला भेट देतील अशी आशा ते बाळगून आहेत, असे काँग्रेस माध्यम विभाग प्रमुख अमरनाथ पणजीकर यांनी म्हटले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इटलीमध्ये पोप फ्रान्सिस यांची भेट घेऊन त्यांना भारत भेटीचे निमंत्रण दिल्यानंतर पोप गोव्याला भेट देण्याची आशा आहे असे म्हणणाऱ्या मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या सोशल मीडिया पोस्टवर ते प्रतिक्रिया देत होते.

2023 च्या सुरुवातीला पोप फ्रान्सिस यांनी भारताला भेट देण्याची इच्छा जाहीर केली होती याची मला मुख्यमंत्र्यांना आठवण करून द्यायची आहे, असे अमरनाथ पणजीकर म्हणाले.

पोपच्या घोषणेनंतर लगेचच, गोव्याचे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून पोप फ्रान्सिसच्या प्रवास कार्यक्रमाच्या अंतर्गत गोवा असावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची विनंती केली होती.

त्यांनी मुख्यमंत्र्यांना त्यांच्या पत्राच्या तारखेपासूनच पोप भेटीची तयारी सुरू करण्याची विनंती केली होती, असे अमरनाथ पणजीकर यांनी नमूद केले.

'आशा' या शब्दाचा उल्लेख करणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या सोशल मीडिया पोस्टमुळे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गेल्या 15 महिन्यांत काहीही केले नाही हे सत्य समोर आले आहे.

भाजपच्या अल्पसंख्याक विरोधी धोरणानेच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांच्या पत्रावर कारवाई न करण्यास भाग पाडले असावे, असा दावा अमरनाथ पणजीकर यांनी केला.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आतातरी वेळ न दवडता, पोप फ्रान्सिस यांच्या भारत भेटीच्या कार्यक्रमात गोव्याचा समावेश करण्यासाठी पंतप्रधान कार्यालयाला पत्र पाठवावे, असे अमरनाथ पणजीकर म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News : ‘कल्‍की’मध्‍ये चमकतोय गोमंतकीय ‘ध्रुव’ तारा; छोडी पण महत्वपूर्ण भूमिका

Vijay Sardesai : विजय सरदेसाई यांनी ऐकली काणकोणवासीयांची गाऱ्हाणी

Mapusa Municipal Market : म्हापशात भिकाऱ्यांमध्ये वाढ; समस्या सोडवण्याची मागणी

DGP Jaspal Singh : डीजीपींची खुर्ची अस्थिर, बिश्णोईंकडे देणार ताबा

Goa Weather Update : राज्यात पाऊस @ ३५ इंच; सरासरीच्या तुलनेत ४ टक्के अधिक

SCROLL FOR NEXT