Goa CM Pramod Sawant gomantak
गोवा

Sanquelim News : प्रत्‍येकाने स्‍वस्‍थ राहण्‍याचा संकल्‍प करूया - मुख्यमंत्री प्रमोद सावंत

गोमन्तक डिजिटल टीम

Goa CM Pramod Sawant on Gudi Padwa: गुढीपाडव्याच्या निमित्ताने सर्वांनी स्वस्थ राहण्याचा संकल्प केला पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या ‘स्वच्छ भारत’ ते आता ‘स्वस्थ भारत’ या मंत्रावर सर्वांनी कार्य करावे, असे सांगून नववर्षारंभी ‘स्वच्छ भारत’बरोबरच ‘स्वस्थ भारत’चा संकल्प करावा, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

निरोगी आणि स्वस्थ राहण्यासाठी सर्वांनी योगसाधना व प्राणायाम यांचा अवलंब दैनंदिन जीवनात करावा, असेही ते म्हणाले. साखळी येथे हिंदू नववर्ष स्वागताप्रीत्यर्थ आयोजित सोहळ्यात ते बोलत होते.

साखळी नववर्ष स्वागत समितीतर्फे नववर्ष शोभयात्रा व ध्वजपूजन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. साखळी बाजारात विधीवतपणे ध्वजपूजन व ध्वजारोहण झाले.

त्यानंतर शहरात शोभयात्रा काढण्यात आली. के. बी. हेडगेवार हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी दिंडी सादर करून शोभयात्रेत उत्साह निर्माण केला.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, नगराध्यक्ष राजेश सावळ, नगरसेवक आनंद काणेकर, दयानंद बोर्येकर, शुभदा सावईकर, समितीच्या अध्यक्षा राधिका कामत सातोस्कर यांनी शोभयात्रेत सहभाग घेतला.

शोभयात्रा साखळी शहरातून गोकुळवाडी येथील श्री राधाकृष्ण मुरलीधर संस्थानात दाखल झाल्यानंतर घंटानाद झाला.

त्यानंतर आयोजित औपचारिक कार्यक्रमाला व्यासपीठावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, प्रमुख वक्ते योगशिक्षक संदेश बाराजणकर, नगराध्यक्ष राजेश सावळ, नगरसेवक आनंद काणेकर, दयानंद बोर्येकर, शुभदा सावईकर, नववर्ष स्वागत समितीच्या अध्यक्षा राधिका कामत सातोसकर, सचिव अभय बर्वे, उपाध्यक्ष सुशांत पाटील आदींची उपस्थिती होती.

स्वागत राधिका कामत सातोसकर यांनी, सूत्रसंचालन नगरसेविका शुभदा सावईकर यांनी तर अभय बर्वे यांनी आभार मानले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

लोकांनी सर्वच बाबतीत सरकारवर जबाबदारी टाकून चालणार नाही. कोणत्याही विधायक कार्याची सुरूवात प्रत्येकाने स्वतःपासून व आपल्या घरापासून करावी. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाने स्वतःच्या आरोग्याकडे अधिक लक्ष द्यायला हवे. निरोगी आणि स्वस्थ राहण्यासाठी योगसाधना व प्राणायाम यांचा अवलंब दैनंदिन जीवनात करावा.

- डॉ. प्रमोद सावंत, मुख्‍यमंत्री

भारतीय संस्कृती जपत असताना अभिमान बाळगायला हवा. आमच्या संस्कृतीबाबत गैरसमज आज पसरविले जात आहेत. त्यामुळे आमच्या लोकांनी अनेक गोष्टींकडे दुर्लक्ष केले आहे. येत्या काळात प्रत्येक मंदिराची एक गोशाळा असावी, तसेच गो आधारित शेती निर्माण व्हावी. सनातन हिंदू धर्माच्या रक्षण आणि संवर्धनाचा संकल्प आजच्या दिवशी करायला हवा.

संदेश बाराजणकर, योगशिक्षक

आपले आरोग्य सांभाळणे आवश्यक असून त्यासाठी योग हे एक चांगले माध्यम आहे. आरोग्य चांगले राहिल्यास आम्ही संस्कृती व आपल्या समाजाच्या रक्षणासाठी झटू शकतो. आपल्‍या संस्‍कृतीचे जतन करणे हेसुद्धा तेवढेच महत्त्‍वाचे आहे. प्रत्‍येकाने त्‍यासाठी पुढाकार घेतला पाहिजे आणि आजच्‍या दिवशी तसा संकल्‍प केला पाहिजे.

राजेश सावळ, साखळीचे नगराध्यक्ष

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT