Sulakshana Sawant In Karnataka  Dainik Gomantak
गोवा

Sulakshana Sawant: जिंकणारच! मुख्यमंत्री यांच्यानंतर त्यांच्या पत्नीचा भाजपसाठी कर्नाटकात प्रचार

कर्नाटकची विधानसभा निवडणूक जवळ आली असून, त्यासाठी भाजप जोरदार प्रचार करत आहे.

Pramod Yadav

Sulakshana Sawant In Karnataka: कर्नाटकची विधानसभा निवडणूक जवळ आली असून, त्यासाठी भाजप जोरदार प्रचार करत आहे. देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री यांच्यासह भाजपच्या प्रमुख नेत्यांनी कर्नाटकमध्ये भाजपसाठी प्रचार सभा घेतल्या आहेत. कर्नाटकचा शेजारी गोव्यातील भाजप नेते देखील पक्षासाठी प्रचार करत आहेत.

काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री सावंत (Goa CM Pramod Sawant) यांनी भाजपसाठी कर्नाटकमध्ये प्रचार केला. त्यानंतर त्यांच्या पत्नी यांनी देखील पक्षासाठी प्रचारात उडी घेतली आहे.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या पत्नी सुलक्षणा सावंत (Sulakshana Sawant) यांनी कर्नाटकमधील खानापूर विधानसभा मतदारसंघात प्रचाराचा शुभारंभ केला. त्यांनी मतदार संघातील भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधला. "खानापूर मतदारसंघाची जबाबदारी माझ्या खंद्यावर असल्याचा मला अभिमान आहे. आम्हाला खात्री आहे की उमेदवार विठ्ठल हलगेकर जिंकणारच." असे ट्विट सुलक्षणा सावंत यांनी केले आहे.

यावेळी सुलक्षणा सावंत यांनी ज्येष्ठ कार्यकर्ता यांच्या उपस्थितीत मंडळ कार्यकर्ता, महाशक्ती केंद्र आणि शक्ती केंद्र प्रमुख यांच्या समवेत झालेल्या बैठकीला संबोधित केले.

कर्नाटकात प्रचारासाठी गोव्यातून जाणार नेत्यांची मोठी फौज

कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीत प्रचारासाठी गोव्यातून भाजपने नेत्यांची फौजच जाणार आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे भाजपचे स्टार प्रचारक असणार आहेत.

तर आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांच्यासह सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल, वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो, जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर हेही प्रचारासाठी जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी या पक्षीय जबाबदाऱ्या जाहीर केल्या आहेत.

याशिवाय भाजपकडून माविन गुदिन्हो, सुभाष शिरोडकर, ॲड. नरेंद्र सावईकर, दामू नाईक, आमदार मायकल लोबो, प्रेमेंद्र शेट, उल्हास तुयेंकर, दाजी साळकर, प्रवीण आर्लेकर, केदार नाईक आणि माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर हे नेते प्रचारासाठी कर्नाटकमध्ये जाणार असल्याची माहिती पक्षाच्या सूत्रांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: गोमंतकीयांना कोट्यवधींचा गंडा घालणारा ठग सापडला, मुंबईत आवळल्या मुसक्या; गुन्हे शाखेला मोठे यश

Mhaje Ghar: गोमंतकीयांना परवडणारे ‘माझे घर’ देणार! CM सावंतांचे आश्वासन; ‘गृहनिर्माण’कडून आराखड्याचे काम सुरू

Goa Education: 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! दहा टक्‍के गुण मिळवणारेही होणार उत्तीर्ण; वाचा संपूर्ण माहिती..

Goa Politics: खरी कुजबुज; विजयचा दावा खरा ठरणार?

Paragliding Accident: पॅराग्लायडिंग करताना दोघांचा अपघाती मृत्यू, 1 वर्षानंतर मुख्य संशयितावरील गंभीर गुन्हा हटवला

SCROLL FOR NEXT