Amit Shah: म्हादई, कर्नाटक आणि लोकसभा निवडणूक... म्हणून अमित शहा यांच्या गोव्यातील सभेला अनेक अर्थ आहेत

गोव्याची जीवनदायी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या म्हादईवरून सध्या कर्नाटक आणि गोवा यांच्यात वाद सुरू आहे.
Amit Shah Rally In Goa
Amit Shah Rally In GoaDainik Gomantak
Published on
Updated on

Amit Shah Rally In Goa: राजकारणातील चाणक्य म्हणून ओळख असणारे भाजप नेते आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची गोव्यात रविवारी भव्य सभा होत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही सभा महत्वाची मानली जात आहे. यावेळी राज्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा जिंकण्याचा संकल्प भाजपने केला आहे.

गोव्याची जीवनदायी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या म्हादईवरून सध्या कर्नाटक आणि गोवा यांच्यात वाद सुरू आहे. अशात म्हादईबाबत शहा यांनी वेळोवेळी केलेल्या वक्तव्यावरून वाद झाला. कर्नाटक देखील म्हादईबाबत नेहमी आक्रमक भूमिका घेत असतो. त्यामुळे म्हादईच्या मुद्यासह कर्नाटक आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहा (Amit Shah) यांच्या गोव्यातील सभेला अनेक अर्थ आहेत.

म्हादई आणि शहांची भूमिका

म्हादई नदीच्या उपनद्या असणाऱ्या कळसा आणि भांडुराचे पाणी वळवण्यासाठी कर्नाटकच्या सुधारीत डीपीआरला केंद्राने मंजुरी दिली. यामुळे म्हादईच्या मुद्यावरून गोवा आणि कर्नाटक राज्य एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. राज्यातील विरोधी पक्षांनी सावंत सरकराने कर्नाटकला म्हादई विकली असा आरोप केला.

दरम्यान, मुख्यमंत्री सावंत यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने दिल्लीत केंद्रीय जल मंत्री आणि गृहमंत्री यांची भेट घेतली. या भेटीत शहा यांनी, "गोव्यात म्हादईवरून काही आंदोलन होणार नाही, तेथील लोक निवांत आहेत, काळजी करू नका." असे वक्तव्य केल्याची चर्चा समोर आली होती.

कर्नाटकच्या निवडणूक प्रचारावेळी बेळगावमध्ये देखील, "म्हादईचा प्रश्न गोव्याच्या सहमतीने सोडवला असून, उत्तर कर्नाटकातील शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी देण्यासाठी आपण येथे आलो आहोत." असे वक्तव्य शहांनी केले होते. या दोन्ही वक्तव्यावरून गोव्यात मोठा वादंग झाला. त्यामुळे अमित शहा म्हादईबाबत गोव्यातील सभेत काय बोलणार, कोणती भूमिका घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. म्हादईवरून शहा कशा पद्धतीने बाजू सावरणार की म्हादईचा मुद्दा टाळणार हे उद्याच्या सभेत स्पष्ट होईल.

Amit Shah Rally In Goa
Amit Shah in Goa: अमित शहा यांच्या दौऱ्यातून लोकसभेच्या प्रचाराचा बिगुल

कर्नाटक निवडणूक

कर्नाटकमध्ये होऊ घातलेल्या आगामी विधानसभा निवडणूक हा मुद्दा देखील महत्वाचा ठरणार आहे. कर्नाटकमध्ये भाजप आणि काँग्रेस यांच्यात प्रमुख लढत होत असून, दोन्ही पक्षांनी म्हादईचा मुद्दा कळीचा बनवला आहे. अलिकडेच बोम्मई यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारने म्हादईचे पाणी वळवण्यासाठी आणि नियोजित कळसा भांडुरा प्रकल्पासाठी भरघोस निधी मंजूर केला आहे. थोडक्यात म्हादईच्या पाण्यावरून मते मिळवण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे.

दरम्यान, शहांनी बेळगावमध्ये केलेल्या वक्तव्यानंतर म्हादईबाबत शहा गोव्यात काय मत मांडणार याकडे राजकीय जाणकारांचे लक्ष लागून राहीले आहे. दोन्ही वक्तव्यांवर शहा कशा पद्धतीने पांघरूण घालत, दोन्ही राज्यातील मतदारांना कशापद्धतीने खूश करताहेत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

विशेष म्हणजे कर्नाटक निवडणुकीत प्रचारासाठी गोव्यातून मंत्री आणि नेत्यांची मोठी फौज कर्नाटकात जाणार आहे. दोन्ही राज्यातील पाणी वादाच्या तोंडावर कर्नाटकमध्ये भाजप प्रचाराबाबत राज्यातील जनतेच्या समिश्र प्रतिक्रिया आहेत.

Amit Shah Rally In Goa
Mahadai Water Dispute: भाजपने शहांचे विधान चुकीचे सिद्ध करावे-पणजीकरांचा टोला

उत्तर, दक्षिण लोकसभा मतदारसंघ

केंद्रीय गृहमंत्री शहा फार्मागुडी येथे होणाऱ्या सभेने लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजवतील. भाजपने प्रामुख्याने दक्षिण गोव्यातील लोकसभा जागेसाठी कंबर कसली आहे. दक्षिण गोव्याचे काँग्रेस खासदार फ्रान्सिस सार्दिन यांचे या मतदार संघावर 2009 पासून वर्चस्व आहे. या वर्चस्वाला सुरूंग लावण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे, दरम्यान, याला किती यश येते हे आगामी काळात स्पष्ट होईल.

तसेच, उत्तर गोव्याचा गड श्रीपाद नाईक (Shripad Naik) 1999 पासून राखला आहे. दरम्यान, आगामी काळात त्यांच्या उमेदवारीबाबत काही निर्णय घेतला जातो का? हे देखील पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

काँग्रेसच्या 'त्या' बंडखोर नेत्यांना आशा मंत्रिपदाची

काँग्रेसच्या आठ बंडखोर आमदारांनी मागील वर्षी भाजमध्ये प्रवेश केला. त्यामुळे राज्यातील भाजपचे बळ वाढले आहे. दरम्यान, या नेत्यांच्या पक्ष प्रवेशापासून राज्यातील मंत्रिमंडाळाच्या विस्ताराची चर्चा होत आहे. त्याबाबत देखील शहांच्या दौऱ्यात काही चर्चा होते का याबाबत देखील राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com