CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

CM Pramod Sawant: सोलापुरात हुर्डा पार्टीनंतर मुख्यमंत्री पंढरपुरात विठ्ठल रखुमाईच्या दर्शनाला; उद्या कोल्हापूर दौरा

राष्ट्रवादी, शिवसेना नेत्यांच्या गाठीभेटीने राजकीय तर्कवितर्कांना उधाण

Akshay Nirmale

CM Pramod Sawant: गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत दोन दिवसांच्या सोलापूर-कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. बुधवारी त्यांनी सोलापूर दौऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना नेत्यांची गाठीभेठी घेतल्या. सायंकाळी त्यांनी पंढरपुरातील विठ्ठल-रखुमाई मंदिराला भेट दिली.

विठ्ठल मंदिराला दिलेल्या भेटीची माहिती मुख्यमंत्री सावंत यांनी ट्विट करून दिली आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, पंढरपूर येथे श्री विठ्ठल- रखुमाईचे दर्शन घेतले. राज्यातील जनतेला सुख, शांती, समृद्धी लाभू, राज्याची भरभराट होऊ दे, यासाठी मनोभावे प्रार्थना केली.

येथ म्हणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो।

येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाहला ॥

असे ट्विट त्यांनी केले आहे.

दरम्यान, सावंत यांनी सोलापुरात विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. प्रामुख्याने शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या भेटीमुळे हे नेते भाजपच्या गळाला लागणार का? यावर सध्या सोलापुरात जोरदार चर्चा सुरू आहे.

सकाळी सोलापूर विमानतळावर खासगी चार्टर विमानाने मुख्यमंत्री सावंत यांचे आगमन झाले. त्यांनी तुळजाभवानीचे दर्शन घेतले. दिवसभर सावंत यांनी सोलापूर, अक्कलकोट, माढा, मोहोळ, पंढरपूरला येथे भेटी दिल्या. डॉ. सावंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांच्या निवासस्थानी भेट दिली.

राजन पाटील हे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात. राजन पाटील यांनी अमित शहा यांचीही भेट घेतली होती. आज प्रमोद सावंत यांना भेटल्याने ते भाजपच्या गळाला लागणार असल्याची चर्चा आहे. याशिवाय सावंत यांनी माजी सहकार मंत्री, भाजप आमदार सुभाष देशमुख यांच्या घरीही भेट दिली.

हुरडा पार्टीचा घेतला आनंद

मुख्यमंत्री सावंत यांनी आज सोलापूर दौऱ्यादरम्यान सोलापूरच्या मालदंडी आणि बार्शी शाळूच्या हुरड्याचा मनसोक्त आनंद घेतला. या हुरड्यासोबत सोलापुरी शेंगदाणा चटणी, जवस चटणी आणि सांगोल्याच्या प्रसिद्ध द्राक्षांचाही सावंत यांनी आस्वाद घेतला.

डॉ. सावंत उद्या कोल्हापुरात

डॉ. सावंत 23 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजता सोलापूर विमानळावरून खासगी चार्टर विमानाने कोल्हापूरकडे रवाना होणार आहेत. ते साडेनऊ वाजता कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर टेंबलाईवाडी, कणेरी मठ येथील सिध्देश्वर मंदिरात देवदर्शन करून ते कोल्हापूर विमानतळावरून गोव्याकडे प्रयाण करणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Donald Trump: ''...तर आज इस्रायलचे अस्तित्वच नसते'' लेबनॉनमधील कारवाईवरुन ट्रम्प यांचे खळबळजनक वक्तव्य; नेतन्याहूंच्या युद्धनीतीवर सवाल

FIFA World Cup 2026: उरुग्वेकडून खेळतोय 'गोव्या'शी नातं असलेला खेळाडू; सौदी अरेबियाविरुद्ध केला निर्णायक गोल, कोण आहे Maximiliano Araujo?

Goa Village News: उसगाव-गांजेतील घरपट्टी शुल्कात होणार कपात; विशेष ग्रामसभेत ठराव संमत, गरिबांना होणार लाभ

Mayem Kayaking Service: मये तलावात 'कायाकिंग' बोटिंग सेवा सुरू

Emergency Health Services: आपत्कालीन आरोग्य सेवा होणार अधिक सक्षम; 24 तास नियंत्रण कक्ष उभारण्याचा प्रस्ताव, 108 सेवेचा सखोल आढावा

SCROLL FOR NEXT