Pramod Sawant & Vishwajit Rane Dainik Gomantak
गोवा

गोव्यातील नेते दिल्ली दरबारी; रणनीती, पक्षसंघटन आणि इतर घडामोडींवर खलबतं

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि नगर नियोजन मंत्री विश्वजित राणे दिल्लीत

गोमन्तक डिजिटल टीम

CM Pramod Sawant & Vishwajit Rane सध्या देशात 2024 च्या निवडणुकीचे वारे वाहू लागले असून भाजपा, काँग्रेससहित सर्वच पक्षांनी प्रसार आणि प्रचारावर जोर द्यायला सुरुवात केलीय. विशेषतः काँग्रेसला पराभूत करण्यासाठी भाजपा आणि संबंधित पक्षांकडून विशेष रणनीती आखली जात आहे.

याचाच एक भाग म्हणून कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि जेडीएस पक्षाचे नेते एचडी कुमारस्वामी यांनी आज (शुक्रवारी) केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे नेते अमित शाह यांची दिल्लीत भेट घेतली असल्याची माहिती मिळाली आहे.

या भेटी दरम्यान गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत देखील उपस्थित होते. तर राज्याचे आरोग्य आणि नगर नियोजन मंत्री विश्वजित राणे यांनीही नवी दिल्लीत देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान दाभोळी विमानतळाच्या आसपासच्या बफर झोनबाबत चर्चा केल्याची माहिती प्राप्त झालीय.

मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुका येऊ घातल्या असून या सर्व राज्यांमध्ये भाजपच्यावतीने परिवर्तन यात्रा आयोजित केल्या जात आहेत.

या यात्रांमध्ये गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हजेरी लावत असून, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड येथे यात्रेत सहभागी झाल्यानंतर सावंत आता राजस्थान येथील यात्रेत सहभागी होण्यासाठी गेले आहेत. प्रमोद सावंत हे यापूर्वी कर्नाटकातही भाजपच्या प्रचारासाठी मैदानात उतरले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

Ranji Trophy 2024: मोहितचा 'पंजा' अन् फलंदाजांचा जलवा, गोव्यानं उडवला मिझोरामचा धुव्वा; नोंदवला सलग चौथा विजय!

Goa Live Updates: एंटर एअरचे पहिले चार्टर गोव्यात दाखल!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Goa Onion Rates: कांद्याने आणले डोळ्यात पाणी! नासाडीमुळे दोन दिवसात दरांमध्ये तब्बल २० रुपयांनी वाढ, जाणून घ्या सध्याचा भाव

SCROLL FOR NEXT