CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

CM Pramod Sawant: प्लास्टिक वापरावर विचारमंथन गरजेचे

मुख्यमंत्री सावंत : मुंबई येथे डिसेंबरमध्ये ‘प्लास्टिव्हीजन’ कार्यक्रम

गोमन्तक डिजिटल टीम

CM Pramod Sawant: प्लास्टिक उत्पादनांच्या कृषीतील वापरासोबतच प्लास्टिकचा समाजावर होणार परिणाम तसेच त्याच्या पुनर्वापरावर विचारमंथन होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

गास्पार दी डायस येथे आयोजित प्लास्टिव्हिजन कार्यक्रमाअंतर्गत प्लास्टिकल्चर ॲण्ड मायक्रोन्यूट्रीएंड कार्यशाळेच्या उद्‌घाटनसमयी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी अखिल भारतीय प्लास्टिक उत्पादन संघटनेचे संचालक चंद्रकांत तुराखिया, कृषी संचालक नेव्हील आल्फोन्सो उपस्थित होते.

दरम्यान, मुख्यमंत्री सावंत म्हणाले, मुंबई येथे 7 ते 11डिसेंबरदरम्यान आयोजित प्लास्टिव्हीजन कार्यक्रमाला आमचे अधिकारी भेट देतील. गोव्याच्या अनुषंगाने कोणत्या गोष्टी उपयुक्त आहेत त्याबाबत माहिती घेतील.

कृषी संचालक नेव्हील आल्फोन्सो म्हणाले, कृषी क्षेत्रात प्लास्टिकचा वापर पाणी साठविण्यासाठी, ड्रीपिंग करण्यासाठी तसेच इतर गोष्टींसाठी केला जातो.

त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची बचत होते व गरजेप्रमाणे पाणी शेतीसाठी वापरता येते. प्लास्टीकचा वापर करत असताना आपण पर्यावरणाचाही विचार केला पाहिजे.

येतील 30 देशांचे प्रतिनिधी : ‘प्लास्टिव्हिजन २०२३’ या मुंबई येथे होणाऱ्या कार्यक्रमात जगभरातील ३० देशांचे सुमारे पंधराशेहून अधिक प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. या भव्य प्रदर्शनात कृषी, प्लास्टिक, आरोग्य, रोजगार तसेच इतर विविध घटकांचा समावेश असून यासंबंधी येथे माहिती प्राप्त होणार असून आवर्जून उपस्थिती लावावी, असे आवाहन चंद्रकांत तुराखिया यांनी सांगितले.

400 कोटींची इंडस्ट्री

नारळाचा केवळ खाद्यपदार्थ म्हणून वापर न करता त्यापासून विविधांगी वस्तू बनविता येतात. नारळाचा काथा ही 400 कोटींची इंडस्ट्री आहे. याबाबत आम्ही विचार करत नाही. नारळाकडे केवळ खाद्यउत्पादन म्हणून न पाहता एक इंडस्‍ट्री म्हणून पाहणे गरजेचे असल्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: इराणवर काडीचाही भरवसा नाही...! मध्यपूर्वेतील युद्धावरुन अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचा थेट हल्लाबोल; अण्वस्त्रांवरुनही ठणकावलं

VIDEO: चालकाचे नियंत्रण सुटले, गाडी गेली थेट कालव्यात; एकजण गंभीर जखमी

Goa Beach: '..तोवर गोव्याची सुंदर ठिकाणे या समस्येचा भार सहन करत राहतील'! कचऱ्याची समस्या

VIDEO: 'व्हायोलिन वाजवत चालवली सायकल', गोव्याच्या 'डोनाल्ड'चा अनोखा पराक्रम; मानसिक आरोग्याबाबत जागृतीचा दिला संदेश

Goa Accident: गतिरोधक ठरला जीवघेणा! स्कूटरवरील नियंत्रण सुटल्याने दुर्दैवी अपघात; केरळच्या 26 वर्षीय तरुणाचा गोव्यात मृत्यू

SCROLL FOR NEXT