Amarnath Panjikar: सरकारकडून विविध योजनांच्या लाभार्थींना तब्बल 330 कोटींचे येणे

मुख्यमंत्र्यांकडून फसवणूक; मडगावात आज पदयात्रा
Amarnath Panjikar
Amarnath PanjikarDainik Gomantak
Published on
Updated on

Amarnath Panjikar: समाजकल्याण खाते, महिला व बालविकास खाते आणि क्रीडा खात्याच्या विविध योजनांच्या लाभार्थींना 330 कोटी 78 लाख रुपये सरकार देणे आहे. ही रक्कम गणेश चतुर्थीपूर्वी देऊ, अशी थाप मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मारली आहे.

त्यांनी किमान विघ्नहर्त्या गणरायाला घाबरून तरी लाभार्थ्यांची अशी फसवणूक करू नये, असे कॉंग्रेसच्या माध्यम विभागाचे प्रमुख अमरनाथ पणजीकर यांनी बुधवारी सरकारला सुनावले.

कॉंग्रेस भवनमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आठ वर्षांहून अधिक काळ बाकी असलेली ही रक्कम 15 सप्टेंबर 2023 पूर्वी वितरित होईल, या मुख्यमंत्र्यांच्या शब्दावर विश्वास तरी कसा ठेवायचा, अशी विचारणा पणजीकर यांनी पत्रकार परिषदेत केली.

कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रदीप नाईक यांनी सांगितले, की भारत जोडोच्या वर्षपूर्तीनिमित्त मडगाव येथे गुरुवारी (ता.७) देवज्ञ समाज सभागृहाकडून लोहिया मैदानापर्यंत सायंकाळी 4 वाजता पदयात्रा काढण्यात येईल. मैदानावर पदयात्रेचे रूपांतर सभेत होईल. यावेळी त्यांच्यासोबत शिवोली गटाध्यक्ष पार्वती नागवेकर उपस्थित होत्या.

Amarnath Panjikar
Rumdamol Murder Case: बेळ्‍ळारी खून : आणखी दोघांना अटक तर अजूनही एक संशयित फरार

दरम्यान, क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी सांगितले की विशेष क्रीडापटूंना बक्षिसे देण्यासाठी तरतूद नव्हती. तरीही त्‍यांना पदके मिळवली म्हणून बक्षिसाची रक्कम गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या माध्यमातून गणेश चतुर्थीपूर्वी दिली जाणार आहे. कागदोपत्री सोपस्कारामुळे त्याला विलंब झाला आहे.

Amarnath Panjikar
Goa Marine Life: आपद्‍ग्रस्त समुद्री जीवांना मिळणार जीवदान; सिकेरी- बाणावलीच्या किनाऱ्यांवर पार पडले 'खास' प्रशिक्षण

कोणाचे किती पैसे मिळणे बाकी

समाजकल्याण लाभार्थी - ३५ कोटी ७३ लाख

कोविड महामारी उपेक्षित व असंघटित घटक मदत - २१ कोटी ५० लाख

कोविडमुळे मृत्यू पावलेल्या वारसांना (८० कुटुंबे) - १ कोटी ६० लाख

दिव्यांग व्यक्तींना साहाय्य - १ कोटी ६० लाख

दयानंद सामाजिक सुरक्षा योजना - ५५ कोटी

इतर मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्ती - ३ कोटी ६ लाख

अनुसूचित जाती विद्यार्थी शिष्यवृत्ती - ४ कोटी ३७ लाख

इतर मागासवर्गीय मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती - १ कोटी ६ लाख

अटल आसरा योजना - ८ कोटी ५८ लाख

लाडली लक्ष्मी योजना (१५,२२६ लाभार्थी) - १५२ कोटी २६ लाख

गृह आधार - ८० कोटी ४७ लाख

ममता योजना - ४ कोटी २८ लाख

मातृवंदना- १ कोटी २ लाख

खेळाडूंना आर्थिक मदत - ७३ लाख ७४ हजार

खेळाडू बक्षीस रक्कम- १ कोटी ११ लाख

Amarnath Panjikar
Rumdamol Murder Case: बेळ्‍ळारी खून : आणखी दोघांना अटक तर अजूनही एक संशयित फरार

सरकारने विशेष क्रीडापटूंनी विदेशात जाऊन पदके मिळवली तरी त्यांना बक्षिसाची रक्कम अद्याप दिलेली नाही. विशेष क्रीडापटू, क्रीडापटू, अनुसूचित जाती-जमातीतील विद्यार्थी, महिला या साऱ्या समाजघटकांना सरकारने दप्तरदिरंगाईचा खाक्या दाखवला आहे.

- अमरनाथ पणजीकर, कॉंग्रेसच्या माध्यम विभागाचे प्रमुख

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com