Goa Marine Life: आपद्‍ग्रस्त समुद्री जीवांना मिळणार जीवदान; सिकेरी- बाणावलीच्या किनाऱ्यांवर पार पडले 'खास' प्रशिक्षण

खासगी संस्थांचा उपक्रम : 50 वनरक्षकांसह 450 जीवरक्षकांनाही दिले जीवरक्षणाचे धडे
Goa Marine Life
Goa Marine LifeDainik Gomantak

Goa Marine Life डॉल्फीन, कासव, समुद्री साप, पक्षी समुद्रात किंवा किनाऱ्यावर जखमी झाले तर आपत्कालीन स्थितीतून त्यांची सुटका कशी करावी, याचे प्रशिक्षण वन खात्याच्या 50 कर्मचाऱ्यांना देण्यात आले.

सिकेरी आणि बाणावली किनाऱ्यांवर यासाठी खास प्रशिक्षण वर्गाचे आयोजन केले होते. यानिमित्ताने ‘दृष्टी मरिन’च्या 450 जीवरक्षकांनाही या विषयाचे धडे देण्यात आले.

अनेकदा पशु-पक्षी जखमी अवस्थेत समुद्रात आढळून येतात किंवा किनाऱ्यावर असतात. त्यांची सुटका कशी करायची, त्यांच्यावर कोणते प्रथमोपचार करावेत, हाताळणीवेळी कोणती काळजी घ्यावी, याविषयी विस्तृत मार्गदर्शन करण्यात आले.

‘टेरा कॉन्सियस ॲण्ड शॅमेलीअन वाईल्ड लाईफ रेस्क्यू ऑर्गनायझेशन’ या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी मार्गदर्शन केले. सिकेरी येथे उपवन्यजीव संरक्षक अनंत जाधव, तर बाणावली येथे उपवन्यजीव संरक्षक अनिकेत गावकर उपस्थित होते.

आठवडाभर चाललेल्या या प्रशिक्षण वर्गात ‘रिफवॉच मरिन कन्झर्वेशन’ या संस्थेचे विशेषज्ञ सहभागी झाले आणि त्यांनी पशु-पक्ष्यांची मुक्तता कशी करावी, याचे मार्गदर्शन केले.

वार्षिक प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत या वर्गाचे आयोजन केले होते. सध्या किनाऱ्यांवर डॉल्फीन, साप, कासवे, पक्षी वाहून येण्याचे प्रकार वाढल्याने याविषयीचे प्रशिक्षण देण्याचे ठरवण्यात आले होते.

Goa Marine Life
Rumdamol Murder Case: बेळ्‍ळारी खून : आणखी दोघांना अटक तर अजूनही एक संशयित फरार

जुजबी ज्ञान हवेच!

‘टेरा कॉन्सियस’च्या पूजा मित्रा यांनी सांगितले की, वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार पशु-पक्ष्यांची हाताळणी करावी लागते. पशु-पक्षी जखमी झाल्यानंतर त्यांना कशाची गरज असते, याची माहिती असायला हवी.

पशु-पक्षी वाचवण्याच्या कृतीला आता नियमांची जोड मिळाली आहे. प्रथमोपचार कसे करावेत, याची माहिती जीवरक्षकांना मिळाली. त्यामुळे या माहितीच्या आधारे पशु-पक्ष्यांचे संरक्षण करण्यासह जनजागृती करण्यासही मदत होणार आहे.

- अमित शिंदे, प्रशिक्षक, दृष्टी मरिन.

Goa Marine Life
Mormugao News: 'श्रीकृष्ण ओअर कॅरियर्स' संबंधी खंडपीठाकडून गंभीर दखल; जिल्हाधिकाऱ्यांना दिले 'हे' आदेश

बिगर सरकारी संस्था आणि वन खात्याने या प्रशिक्षणासाठी बहुमुल्य असे सहकार्य केले आहे. जीवरक्षकांच्या कौशल्यात वाढ होण्यासाठी या प्रशिक्षणाची मदत होणार आहे. पशू पक्षांना उपचारानंतर नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी हा वर्ग निश्चितच उपयोगी पडेल.

- नवीन अवस्थी, सीईओ, दृष्टी मरिन.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com