Goa CM Pramod Sawant  Dainik Gomantak
गोवा

बँक कर्ज देण्यास मनाई करत असेल तर तक्रार करा; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे शेतकऱ्यांना आवाहन

Goa CM Pramod Sawant: गोव्यात आतापर्यंत या योजनेद्वारे सुमारे ६ हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर सुमारे २४ कोटी रुपये जमा केले आहेत.

गोमंतक ऑनलाईन टीम

साखळी: शेतकऱ्यांना सन्मानाचे जीवन देत असतानाच क्रेडिट कार्डची सोय करून दिली आहे. या क्रेडिट कार्डद्वारे शेतकरी शेती गहाण न ठेवता बँकांमधून किमान एक लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घेऊ शकतो. जर कोणती बँक शेतकऱ्यांना हे कर्ज देण्यास मनाई करत असेल तर थेट विभागीय कृषी अधिकारी किंवा माझ्या कार्यालयाशी संपर्क साधा, असे आवाहनही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

साखळी येथे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या कार्यक्रमात ते बोलत होते. प्रधानमंत्री किसान सन्माननिधी योजनेअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील शेतकऱ्यांप्रती प्रेम व्यक्त केले आहे. गोव्यात आतापर्यंत या योजनेद्वारे सुमारे ६ हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर सुमारे २४ कोटी रुपये जमा केले आहेत.

2 हजार रूपये जमा झाले

राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावर आजपर्यंत १ लाख २० हजार रुपये जमा झाले असून आज एकाच दिवशी २ हजार रुपयांप्रमाणे राज्यातील ६ हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर सुमारे १ कोटी २० लाख रुपये जमा झाले आहेत.

आधार कार्डद्वारे तपासा बॅलन्स (How To check PM Kisan balance?)

पीएम किसान सन्मान निधीच्या लाभार्थ्यांनी प्रथम पीएम किसान वेबसाइटवर जावे. त्यानंतर तेथे बेनिफिशअरी स्टेटसवर (Beneficiaey Status) क्लिक करा. आता तुमचा आधार क्रमांक आणि खाते क्रमांक विचारात टाका. तुम्ही दोघांपैकी कोणतीही माहिती देऊन पुढे जाऊ शकता. गेट डेटा वर क्लिक करताच, लाभार्थ्यांची यादी दिसेल. तसेच, पेमेंटचे तपशील दिसतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT