CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

CM Pramod Sawant: मुख्यमंत्री सावंत यांच्यावर पुण्यात 'अँजिओप्लास्टी' शस्त्रक्रिया यशस्वी, प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती

CM Pramod Sawant Angioplasty In Pune: गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या प्रकृतीबाबत पुणे येथील प्रसिद्ध रुबी हॉल क्लिनिकच्या वतीने अधिकृत माहिती देण्यात आली.

Manish Jadhav

पुणे: गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या प्रकृतीबाबत पुणे येथील प्रसिद्ध रुबी हॉल क्लिनिकच्या वतीने अधिकृत माहिती देण्यात आली असून त्यांना सध्या याच रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. रुबी हॉल क्लिनिकचे मुख्य हृदयरोगतज्ज्ञ, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. परवेझ ग्रँट यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री सावंत यांच्यावर गुरुवारी (19 मार्च) यशस्वीरित्या 'अँजिओप्लास्टी' शस्त्रक्रिया पार पडली. अचानक छातीत दुखू लागल्याने त्यांना तातडीने पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले होते, जिथे तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यावर पुढील उपचार सुरु करण्यात आले.

ही संपूर्ण वैद्यकीय प्रक्रिया कोणत्याही गुंतागुंतीशिवाय पार पडली. डॉ. ग्रँट यांनी दिलेल्या माहितीनुसार, शस्त्रक्रियेनंतर मुख्यमंत्री सावंत यांची प्रकृती सध्या पूर्णपणे स्थिर असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. डॉक्टरांच्या एका विशेष पथकाच्या देखरेखीखाली त्यांना सध्या 'ऑब्झर्व्हेशन'मध्ये ठेवण्यात आले असून त्यांच्या प्रकृतीतील बदलांवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना अचानक छातीत दुखू लागल्याने पुण्यात हलवण्यात आले होते. त्यानंतर तात्काळ रुबी हॉल क्लिनिकमधील तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले. डॉ. परवेझ ग्रँट यांनी मुख्यमंत्री सावंत यांच्या प्रकृतीत होत असलेल्या सकारात्मक सुधारणेबद्दल समाधान व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT