Goa CM Pramod Sawant And MP Supriya Sule Dainik Gomantak
गोवा

'सुप्रिया सुळेंचे वक्तव्य गांभीर्याने घ्यायची गरज नाही', गोव्याचे CM प्रमोद सावंत नागपुरात असे का म्हणाले?

Goa CM Pramod Sawant On MP Supriya Sule: सावंत यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेला संबोधित केले.

Pramod Yadav

Goa CM Pramod Sawant And Supriya Sule

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत लोकसभेसाठी महाराष्ट्रात प्रचार करताना दिसणार आहेत. सावंत यांचा राज्याच्या स्टार प्रचारक यादीत समावेश करण्यात आला आहे. याचाच भाग म्हणून सावंत यांनी सोमवारी राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये हजेरी लावली.

सावंत यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेला संबोधित केले. यावेळी सावंत यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत नागपुरातील हॉटेल सेंटर पॉईंट येथे आयोजित पत्रकार परिषदेला संबोधित करत होते. गेल्या आठवड्यात प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या निवासस्थानाबाहेर गोळीबार झाल्याचे उघडकीस आले.

यावरुन सुप्रिया सुळे यांनी अब की बार गोळीबार सरकार अशी टीका सत्ताधारी भाजपवर केली होती. याबाबत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनाा प्रश्न विचारला असता, सुप्रिया सुळे यांच्या घरात सध्या फूट पडली असल्याने त्या काहीही बोलत असल्याचे सावंत म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली असून, अजित पवार यांच्यासह अनेक आमदार महायुती सरकारला पाठिंबा दिला आहे. घरातील भांडणात सुळे अडकल्या असून, त्यांचे वक्तव्य गांभीर्याने घ्यायची गरज नाही, असे सावंत म्हणाले.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी यावेळी नागपुरातील व्यापारी आघाडी संमेलनाला संबोधित केले. नागपूरचे भाजप उमेदवार नितीन गडकरी यांच्यासाठी सावंत प्रचार करत आहेत. यावेळी जिल्ह्यातील भाजप नेते, कार्यकर्ते आणि व्यापारी आघाडीचे नेते, सदस्य उपस्थित होते.

गडकरींसाठी प्रचार करताना सावंत यांनी डॉक्टरांना देखील संबोधित केले. यावेळी सावंत यांनी मोदींच्या कार्यकाळात झालेल्या विकासाचा लेखाजोखा मांडला.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी यावेळी गोव्यातील अमली पदार्थाबाबत देखील भाष्य केले. अमली पदार्थची लिंक गोव्याशी जोडली जाते मात्र, गेल्या दहा वर्षात भाजप सरकार आल्यापासून याला आळा बसल्याचे वक्तव्य सांवत यांनी यावेळी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Partgali Math Goa: PM मोदींच्या आगमनाची तयारी! पर्तगाळी मठाचा 550 वा वर्धापनदिन, CM सावंतांनी घेतला तयारीचा आढावा

Srinagar Blast: श्रीनगरमध्ये स्फोटाबाबत मोठा खुलासा! 9 ठार, 32 हून अधिक जखमी; दहशतवाद्यांच्या मॉड्यूलशी थेट संबंध

Goa ZP Election: ‘मये’त जिल्हा पंचायत निवडणुकीचे वारे जोरात! फॉरवर्ड, काँग्रेसचे उमेदवार निश्चित; दक्षिण गोव्यात भाजपची चाचपणी

Goa Live News: भीषण अपघात! काणकोण येथे दुचाकीस्वाराला धडक

Sunil Gudlar Case: सुनील गुडलरला कोर्टाचा दणका! CCTV फुटेज देण्याची मागणी फेटाळली; आरोपपत्र दाखल होईपर्यंत वाट पहावी लागणार

SCROLL FOR NEXT