Pallavi Dempo: दक्षिण गोव्यातून पल्लवी धेंपे यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

Pallavi Dempo: भाजपच्या दक्षिण गोवा उमेदवार पल्लवी धेंपे यांनी आगामी लोकसभेसाठी अर्ज दाखल केला आहे.
BJP South Goa candidate Pallavi Dempo files nomination
BJP South Goa candidate Pallavi Dempo files nominationDainik Gomantak

BJP South Goa candidate Pallavi Dempo files nomination

भाजपच्या दक्षिण गोवा उमेदवार पल्लवी धेंपे यांनी आगामी लोकसभेसाठी अर्ज दाखल केला आहे. यावेळी धेंपे यांच्यासोबत मुख्यमंत्री प्रमोद सावंत, वीज खात्याचे मंत्री सुदीन ढवळीकर, पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा आणि कृषीमंत्री रवी नाईक यावेळी उपस्थित होते.

पल्लवी धेंपे, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह राज्यातील मंत्री आणि भाजप कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाल्या.

धेंपे यांनी जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी आश्विन चंद्रू यांच्याकडे लोकसभेचे उमेदवारी अर्ज दाखल केला.

BJP South Goa candidate Pallavi Dempo files nomination
MLA Disqualified Hearing : आमदार अपात्रतेवरील सुनावणी सभापतींसमोर होणार लवकरच

विकसीत भारताचे ध्येय पूर्ण करण्यासाठी भारताला निर्णायक आणि बलशाली नेतृत्व हवं आहे. गोमन्तकीय मनापासून पंतप्रधान नरेंद्र मोदींना समर्थन देतील, असा विश्वास मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला आहे.

अर्ज दाखल करण्यापूर्वी 'रोड शो'

पल्लवी धेंपे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जाताना भाजपने भव्य रोड शोच्या माध्यमातून शक्तीप्रदर्शन केले. रोड शोमध्ये मोठ्या प्रमाणावर भाजप कार्यकर्ते आणि राज्यातील भाजप नेते सहभागी झाले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com