Pramod Sawant Swearing-in Ceremony Live Update Dainik Gomantak
गोवा

Pramod Sawant Swearing-in Ceremony Live Update: गोव्यात भाजपचे सरकार स्थापन

पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रमोद सावंत यांच्या शपथविधी सोहळ्याच्या निमित्ताने प्रथमच आज गोव्यात येत आहेत.

दैनिक गोमन्तक

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या प्रमुख उपस्थितीत आज प्रमोद सावंत (Pramod Sawant) सरकारचा शपथविधी सोहळा मोठ्या दिमाखात पार पडणार आहे. या सोहळ्यात भाजपचे (BJP) 9 मंत्री शपथबद्ध होतील. यातील आठ मंत्र्यांची नावे निश्‍चित झाली आहेत. हा सोहळा ऐतिहासिक पद्धतीने साजरा करण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. (Pramod Sawant Swearing-in Ceremony Live Update)

वाळपईचे आमदार विश्वजीत राणे, मॉविन गुदिन्हो, फोंड्याचे आमदार रवी नाईक, नीलेश काब्राल, सुभाष शिरोडकर, रोहन खंवटे, गोविंद गावडे आणि अतानासिओ उर्फ बाबूश मोन्सेरात यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.

  • प्रमोद सावंत यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर पोहचले.

  • मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लई यांच्याकडे शपथ घेणाऱ्या आमदारांची यादी सादर केली आहे. या यादीत वाळपईचे आमदार विश्वजीत राणे, मॉविन गुदिन्हो, फोंड्याचे आमदार रवी नाईक, नीलेश काब्राल, सुभाष शिरोडकर, रोहन खंवटे, गोविंद गावडे आणि अतानासिओ उर्फ बाबूश मोन्सेरात यांच्या नावाचा समावेश आहे.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पणजीत आगमन झाले आहे. भाजपचे अनेक बडे नेते डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर शपथविधीसाठी पोहचले आहेत.

  • प्रमोद सावंत यांचे डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर आगमन झाले आहे.

  • प्रमोद सावंत यांनी मंत्र्यांनी यादी राज्यपालांकडे सुपूर्द केली.

  • भाजप नेते राजनाथ सिंग शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.

  • या सोहळ्यासाठी येणाऱ्या लोकांची खाण्या-पिण्यासह वाहनांच्या पार्किंगचीही सोय केली आहे. या सोहळ्याला दहा हजार नागरिक उपस्थित राहतील, अशी अपेक्षा आहे. या सोहळ्याचे विविध प्रसार माध्यमांवर थेट प्रसारणही केले जाणार आहे. यावेळी राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांच्याकडून मुख्यमंत्र्यांसह 9 मंत्री पद आणि गोपनीयतेची शपथ घेणार आहेत.

  • आज शपथ घेणाऱ्या मंत्र्यांमध्ये माविन गुदिन्हो, विश्वजीत राणे, रोहन खंवटे, बाबूश मोन्सेरात, नीलेश काब्राल, गोविंद गावडे, नीळकंठ हळर्णकर यांच्या नावाचा समावेश आहे. याशिवाय अपक्ष आमदार आलेक्स रेजिनाल्ड, मगोपचे आमदार सुदिन ढवळीकर यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार आहे. मात्र, भंडारी समाजाचे नेतृत्व करणारे रवी नाईक आणि सुभाष शिरोडकर यांच्यापैकी एकाला मंत्रिमंडळात स्थान दिले जाण्याची शक्यता आहे.

  • महनीय व्यक्तींच्या सुरक्षेसाठी गोवा पोलिस, राज्य राखीव दल, एसपीजी, पंतप्रधानांची खास सुरक्षा व्यवस्था असे सुमारे 800 जवान तैनात करण्यात आले आहेत. अतिमहत्त्वाच्या व्यक्ती नौदलाच्या खास हेलिकॉप्टरने गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ताळगावच्या पठारावर उभारलेल्या खास हेलिपॅडवर हेलिकॉप्टरने दाखल होतील. चार राज्यांतील मुख्यमंत्री, तसेच देवेंद्र फडणवीस, सी.टी. रवी हे रविवारीच गोव्यात दाखल झाले आहेत.

  • या सोहळ्यासाठी राज्यातील दहा हजार नागरिक उपस्थित राहतील, असे अपेक्षित धरून या लोकांच्या जेवणाची व्यवस्था डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमशेजारी करण्यात आली आहे. एका स्टॉलवर पाचशे व्यक्ती असे गृहीत धरून 20 स्टॉल उभारण्यात आले आहेत. यासाठी राज्यातील प्रसिद्ध 8 केटरर्सना जेवणाची ऑर्डर देण्यात आली आहे.

  • केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सकाळी 9 वाजता गोव्यात दाखल होणार. गडकरी 10 वाजता प्रमोद सावंत आणि निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांच्याशी मंत्रिमंडळाच्या अनुषंगाने बैठक घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासमवेत दहा राज्यांचे मुख्यमंत्री प्रथमच एकत्रित येत असल्याने प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टिकोनातूनही कडक बंदोबस्त ठेवला आहे.

  • या भव्य-दिव्य सोहळ्याचे प्रमुख आकर्षण असणार आहेत, पंतप्रधानांसह दिग्गज केंद्रीय मंत्री, काही राज्यांचे मुख्यमंत्री आणि महनीय व्यक्ती. या सोहळ्यासाठी भव्य व्यासपीठ सज्ज केले आहे.

  • भाजपचे प्रमोद सावंत आज सलग दुसऱ्यांदा गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान मोदी, केंद्रीय मंत्री आणि इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

  • या भव्य-दिव्य सोहळ्याचे प्रमुख आकर्षण असणार आहेत, पंतप्रधानांसह दिग्गज केंद्रीय मंत्री, काही राज्यांचे मुख्यमंत्री आणि महनीय व्यक्ती. या सोहळ्यासाठी भव्य व्यासपीठ सज्ज केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

SCROLL FOR NEXT