Goa CM Pramod Sawant On Statehood Day
पणजी: आम्ही गौरवसंपन्न वारसा जपून राज्याचा विकास साधला आहे, असे सांगत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कला अकादमी येथे आयोजित ३९ व्या गोवा घटक राज्य दिन कार्यक्रमात प्रगतीचा आढावा घेतला. तसेच यावेळी पंडित अजित कडकडे यांना 'गोमन्तविभूषण' पुरस्कार त्यांनी जाहीर केला.
व्यासपीठावर मंत्री माविन गुदिन्हो, बाबूश मोन्सेरात, सुभाष शिरोडकर, रोहन खंवटे, सुदिन ढवळीकर, गोविंद गावडे, सुभाष फळदेसाई, उपसभापती जोशुआ डिसोझा उपस्थित होते. सावंत पुढे म्हणाले, पंडित कडकडे यांचे गायन क्षेत्रात अतुलनीय योगदान आहे. यावेळी विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिलेल्या सरकारी विभागांचा सन्मान करण्यात आला.
दोन्हीही भाषांना पुढे घेऊन जाणारे सरकार
आमचे सरकार मराठी आणि कोकणी दोन्ही भाषांना घेऊन पुढे जात आहे. दोन्ही भाषांमध्ये योगदान देणाऱ्यांचा सन्मान केला जात आहे. गोव्यात स्वयंपूर्ण गोवाच्या माध्यमातून अतिशय चांगल्या प्रकारे काम सुरू असून, गोवा सर्वच क्षेत्रांत देशात क्रमांक एकवर आहे. ज्यावेळी पायाभूत सुविधा उभारल्या जातात त्या ठोसपणे दिसत असतात; परंतु प्रशासनात केलेले लहान-सहान बदल दिसून येत नाहीत.
माझ्या सर्व मंत्र्यांनी आपापल्या विभागात प्रशासनाच्या अनुषंगाने पायाभूत बदल केला आहे, त्याचा आढावा विकासपथ या पुस्तकात सविस्तरपणे घेण्यात आला असल्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
कार्यक्रमातील लक्षवेधी क्षण
१) स्वातंत्र्यसैनिकांच्या १६ मुलांना सरकारी नोकरीची नियुक्तीपत्रे प्रदान
२) ज्ञानपीठकार रवींद्र केळकार कोकणी भाषा पुरस्कार देऊन माणिकराव नायक गावणेकर, सुरेश रामचंद्र पै, भिकू बोमी नायक यांचा सन्मान.
३) बा. द. सातोस्कर मराठी भाषा पुरस्कार देऊन शंभू भाऊ बांदेकर, प्रा. अनिल सामंत आणि रमेश वंसकर यांचा सन्मान.
४) अनुकंपा योजनेअंतर्गत ३१ जणांना सरकारी नोकरीची नियुक्तीपत्रे प्रदान.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.