CM Pramod Sawant  Dainik Gomantak
गोवा

CM Pramod Sawant: 'मंत्र्यांनो कार्यालयात 'अशांना' बिलकुल कामावर ठेवू नका!' मुख्यमंत्र्यांच्या सूचना

मुख्यमंत्री सावंत: इतर मंत्र्यांना काळजी घेण्याचा सल्ला

गोमन्तक डिजिटल टीम

CM Pramod Sawant क्रीडामंत्र्यांनी आरोप असलेल्या व्यक्तीकडे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेची जबाबदारी सोपविल्याचा आरोप पावसाळी विधानसभेत झाला होता, तरीही मंत्र्यांकडून त्या व्यक्तीला क्लिनचीट दिली गेली होती.

आता या व्यक्तीकडून ताबा काढून घेतल्याचा आदेश निघाला, ही बाब लक्षात आणून देताच, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ‘अशा पद्धतीने कोणावर आरोप झालेले असतील, तर मंत्र्याने आपल्या कार्यालयात त्यांना ठेवू नये, अशा व्यक्तीवर आरोप असतील तर त्याच्याकडे मंत्र्यांनी संपर्कही ठेवू नयेत. याविषयी आपण तत्काळ आदेश काढू,’ असे स्पष्टीकरण दिले.

‘गोमन्तक’ टीव्हीच्या ‘एडिटर टेक’ या कार्यक्रमात ते बोलत होते. संपादक संचालक राजू नायक यांनी शुक्रवारी मुख्यमंत्र्यांची मुलाखत घेतली, त्यात मुख्यमंत्र्यांनी विविध विषयांना स्पर्श केला.

अप्रेंटिसशिपला जोडले जावे

मुख्यमंत्री ॲप्रेंटिसशिप योजना आणली, परंतु त्यासाठी 6 हजार 500 जागा रिक्त असल्याचे दिसून आले, यावर सावंत म्हणतात, मुख्यमंत्री अप्रेंटिसशिप योजना आम्ही सुरू केली, त्यात एक गोंधळ निर्माण झाला.

5 हजारांवर युवकांनी सरकारी नोकरीसाठी अर्ज केले. एकाने पाच ठिकाणी अर्ज केले आहेत, त्यामुळे जागा अडून राहिल्या. वर्क कल्चर राज्यात विकसित करण्यासाठी आम्ही ही योजना आणली.

केंद्र सरकारच्या राष्ट्रीय विकास योजनेचा पोर्टल वापर करून आम्ही राज्यात आणला. कोणत्याही राज्यात या पोर्टलचा वापर केला नाही, तो गोव्यात सुरू केला.

युवकांनी ॲप्रेंटिसशिपद्वारे नोकरीत जोडले जावे, कारण बेरोजगार राहण्यापेक्षा कार्यरत राहणे आवश्‍यक आहे. राज्यातील युवकांना व्हाईट कॉलर नोकऱ्या हव्या आहेत, त्यांना मजुरी करणे आवडत नाही, त्यांची ती मानसिकता नाही.

हॉस्पिटॅलिटी योजनेत 1 लाख लोक बाहेरील राज्यातून येऊन काम करतात, त्यासाठीच आम्ही आता कौशल्यविकासाद्वारे हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील कोर्सेस आणले आहेत. गोवा मानव संसाधन महामंडळ (गोवा ह्युमन रिसोर्स कार्पोरेशन) मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या काळात सुरू केले.

त्यात 10 हजारांवर युवक काम करीत आहेत, ते तीन वर्षे काम केल्यानंतर त्यांना पोलिस किंवा वनखात्यात आम्ही सहभागी करून घेत आहोत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Today Live Updates: डिचोलीत 24 नोव्हेंबरला 'नवा सोमवार'; शांतादुर्गा देवीचा प्रसिद्ध उत्सव रंगणार

Ranji Trophy 2025: 5 विकेट गेल्या, पंजाबच्या कर्णधाराचे झुंझार शतक; महत्वाच्या सामन्यात गोव्याची पकड ढिली

Goa Sand Extraction: वाळू व्यवसायाच्या वादातून गोळीबार, पेडणे पोलिसांची मोठी कारवाई; 5 संशयितांना ठोकल्या बेड्या

Goa Politics: खरी कुजबुज; ‘गोंय विकले घाटार’

Mhaje Ghar: 'फोंड्याला पोरका समजू नका'! CM सावंतांचे भावनिक आवाहन; घरे कायदेशीर करून देणार असल्याची दिली ग्वाही

SCROLL FOR NEXT