Green Energy Dainik Gomantak
गोवा

अक्षय उर्जेबाबत धोरण बनवणारे गोवा पहिले राज्य : मुख्यमंत्री डॉ. सावंत

अक्षय उर्जा धोरणाचा मसुदा सरकारला पाठवण्यात येणार : मुख्यमंत्री

गोमन्तक डिजिटल टीम

Renewable Energy : राज्यात 2030 पर्यंत बहुतांश प्रकल्प हे अक्षय उर्जेवर चालणारे असतील. यासाठी राज्य सरकारने अक्षय उर्जा धोरण तयार केले असून या धोरणाचा मसुदा सरकारला पाठवण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. मुक्तीदिनाच्या सोहळ्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

मुख्यमंत्री म्हणाले, "अक्षय उर्जेबाबत धोरण बनवणारे गोवा हे पहिले राज्य आहे. आता या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारकडून विविध प्रयत्न केले जाणार असून सौर उर्जा हायड्रो उर्जाचा वापर जास्तीत जास्त करण्याकडे प्रयत्न केले जाणार आहेत. या धोरणाला केंद्र सरकारकडून मंजूरी मिळाल्यानंतर हे धोरण राज्यात प्रत्यक्ष राबविण्यात येईल.

सध्या मूळ धोरणाची अंमलबजावणी सुरु असून 2030 पर्यंत राज्य सरकारची ऊर्जेची आवश्यकता सौर उर्जेमध्ये रुपांतरित करण्यात येईल. सुरुवातीला सरकारी आस्थापनांवर सौर उर्जा पॅनल्स लावण्यात येतील. त्यानंतर नागरिकांनाही यासाठी प्रोत्साहित करण्यात येईल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

विमान धावपट्टीवर पोहोचताच तांत्रिक बिघाड, प्रवाशांना उतरवून केली पुन्हा तपासणी; 'फ्लाय-91'मध्ये गोवा-पुणे प्रवाशांची गैरसोय

International Tiger Day: 2022 मध्ये गोव्यात 6 वाघ दिसले, पुढे काय..?

Goa Assembly Session:राज्यात अनेक घर फोड्या करून सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केलेल्या आरोपीला अटक

Bicholim: ..शुभ्र जलधारा कोसळती! डिचोलीतील धबधब्यावर पर्यटकांची गर्दी; आबालवृद्ध लुटताहेत आनंद

Goa Assembly: परराज्यातील दुचाकींची राज्यात नोंदणी व्हावी! दिलायला लोबोंची मागणी; टॅक्सी व्यवसाय संरक्षित करा असे आवाहन

SCROLL FOR NEXT