CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Mahadayi Water Dispute : कोणत्याही परिस्थितीत म्हादई वळवली जाणार नाही : मुख्‍यमंत्री डॉ. सावंत

गोवा स्टार महिला पुरस्कार वितरण कार्यक्रमात मुख्‍यमंत्र्यांचा पुनरुच्चार

Rajat Sawant

Mahadayi Water Dispute: म्हादई नदी वाचविण्यासाठी शक्य त्या सर्व गोष्टी करण्‍यात आल्‍या आहेत आणि केल्‍या जात आहेत. म्हादई ही समस्‍त गोमंतकीयांची माता आहे. कुठल्याच परिस्थितीत म्हादई वळवली जाणार नाही असे मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

गोवा महिला पुरस्काराचे वितरण मुख्‍यमंत्री डॉ. सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ‘जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित गोव्यातील जगप्रसिद्ध गायिका हेमा सरदेसाई यांनी म्हादईबाबत विचारलेल्या प्रश्नाला मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले.

उद्‌घाटन समारंभात मुख्यमंत्र्यी म्हणाले, "रीबिल्ड इंडिया ट्रस्टने पुढील दोन महिन्यांत संपूर्ण गोव्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. पुरस्कार प्राप्त महिलांकडून प्रेरणा घेवून इतर महिलांनी विवीध क्षेत्रात काम करु शकतात. गोवा सरकारने 2007 मध्ये महिला शक्ती अभियानाला सुरुवात केली."

"पंचायत आणि नगरपालिका क्षेत्रात 33 टक्के आरक्षण बाजूला सारून महिला निवडून येत आहेत. याचे श्रेय त्यांनाच जाते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पुरस्कार प्राप्त महिलांचे अभिनंदन केले. महिलांच्या सहभागामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘स्वच्छ भारत’ उपक्रम यशस्वी झाला व ‘स्वयंपूर्ण गोवा’ मिशनही यशस्वी होत आहे.

गोवा पंचायत महिला शक्ती अभियानातर्फे आयोजित गोवा स्टार महिला पुरस्कार : 2023 हा कौतुकास्पद उपक्रम आहे" असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Session: महसूलबुडव्या कंपन्यांचा खाण लिलावात सहभाग, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांची टीका

Goa Contractual Teachers: कंत्राटी शिक्षकांसाठी 'गूड न्यूज'; कायम करण्‍यासाठी सरकार आखणार योजना, अपात्र शिक्षकांना घरी पाठवणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा

Rashi Bhavishya 07 August 2025: नवीन ओळखी फायद्याच्या ठरतील, घरातील वादविवाद मिटण्याची शक्यता; एखादी शुभवार्ता मिळेल

Goa Police: गोवा पोलिसांच्या ताफ्यात पाच नवीन पीसीआर व्हॅन, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वाटप

Ganesh Festival 2025: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना रेल्वेकडून मोठी भेट; 6 अतिरिक्त विशेष गाड्यांची केली घोषणा!

SCROLL FOR NEXT