ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या 37 व्या राष्ट्रीय स्पर्धेच्या लोगोचे अनावरण आज मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी केंद्रीय गृह राज्यमंत्री निशीथ प्रामानिक, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, क्रीडामंत्री गोविंद गावडे, आयओए’चे सहसचिव कल्याण चौबे उपस्थित होते.
37 व्या राष्ट्रीय स्पर्धेच्या लोगोचे अनावरण करताना मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, "गोव्यातील राष्ट्रीय खेळांचे काउंटडाऊन आता सुरू झाले आहे. सर्व इन्फ्रास्ट्रक्चर तयार आहे. 37 व्या राष्ट्रीय स्पर्धेच्या यजमानपदासाठी गोवा सज्ज आहे."
"37 व्या राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन प्रत्येकाच्या लक्षात राहील अशा पद्धतीने गोवा सरकार करेल. गोव्यात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा घेण्यास इच्छुक असलेल्या प्रत्येकाला सरकार पाठिंबा देईल." असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
37 व्या राष्ट्रीय स्पर्धेच्या तयारीची पाहणी आणि आढावा घेण्यासाठी भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या (आयओए) अध्यक्षा पी. टी. उषा गोवा दौऱ्यावर आल्या होत्या. यावेळी "स्पर्धेसाठीच्या साधनसुविधा आणि इतर तयारीवर आम्ही समाधानी आहोत", असे मत भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले होते.
37 व्या राष्ट्रीय स्पर्धेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली होती.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.