CM Pramod Sawant: तिलारी पाटबंधारे प्रकल्पातील त्या 22 प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागला आहे. त्या कुटूंबांना प्रत्येकी 5 लाख रूपये देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली.
तिलारी पाटबंधारे आंतरराज्य प्रकल्पाच्या नियंत्रण मंडळाची (Interstate Control Board Tillari Irrigation Project) आज, शनिवारी मुंबईत बैठक झाली. यावेळी ते बोलत होते.
या बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गोव्याचे जलस्त्रोत मंत्री सुभाष शिरोडकर आणि मंडळाचे इतर सदस्य उपस्थित होते. मुंबईत ही बैठक झाली.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, महाराष्ट्र आणि गोवा राज्यांत कालव्यांची देखभाल, दुरूस्ती करण्याबाबत विविध मुद्यांवर मतैक्य झाले आहे. 22 कुटूंबांच्या पुनर्वसनाचा मुद्दा प्रलंबित होता.
तो मुद्दाही सोडविण्यात आला आहे. प्रत्येक कुटूंबाला प्रत्येकी 5 लाख रूपये दिले जाणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, याच बैठकीवेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोवा-महाराष्ट्र हे भावासारखे असून म्हाईद पाणी वाटपाच्या लढ्यात कर्नाटकविरोधात महाराष्ट्र आणि गोवा एकत्र लढतील, असे वक्तव्य केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.