Goa CM In Pen Raigad Dainik Gomantak
गोवा

Pen Raigad: गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना पेणच्या आमदारांची भीती का वाटते? रायगडमध्ये CM स्पष्टच बोलले

Goa CM In Pen Raigad: प्रमोद सावंत यांनी यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना फिर एक बार मोदी आणि अब की बार 400 पारचा नारा दिला.

Pramod Yadav

Goa CM In Pen Raigad

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत सध्या देशातील विविध मतदार संघातील विविध कार्यक्रमात हजेरी लावत आहेत. मुख्यमंत्री सावंत यांनी महाराष्ट्रातील मावळ आणि रायगड येथे बूथ स्तरीय कार्यकर्ता महासंमेलनाला संबोधित केले.

प्रमोद सावंत यांनी यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना फिर एक बार मोदी आणि अब की बार 400 पारचा नारा दिला.

या कार्यक्रमाला पेणचे आमदार रवींद्र पाटील, धर्यशील पाटील, अतुल काळसेकर यांच्यासह भाजपचे नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी आमदार रवींद्र पाटील यांनी भाषण केले. याशिवाय महत्वाच्या नेत्यांनी त्यांची मतं व्यक्त केली.

यानंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी कार्यकर्ता महासंमेलनाला संबोधित केले. मुख्यमंत्री सावंत यांनी यावेळी आमदार पाटील यांच्या धडाकेबाज भाषणाचे कौतुक केले.

पाटील यांच्या भाषणानंतर ही जागा चुकून दुसऱ्या कोणाकडे गेली तर परत मी या मतदारसंघात येणार नाही, असे प्रमोद सावंत म्हणाले. कार्यकर्ते सोडा मला त्यांचीच (रवींद्र पाटील) जास्त भीती वाटते, असेही सावंत म्हणाले. तसेच, 99 टक्के या जागेवर भाजपच निवडून येणार असल्याचा दावा देखील त्यांनी केला.

रायगडमध्ये जाण्यापूर्वी त्यांनी मावळ लोकसभा मतदारसंघात देखील कार्यकर्ता महासंमेलनात हजेरी लावली. दोन्ही ठिकाणी कार्यकर्त्यांनी मला भाजपचे तिकिट घेऊन येण्याची विनंती केली होती, त्यानंतर आता मी सिंधुदुर्गचा दौरा रद्द केल्याचे त्यांनी सांगितले.

मतदारसंघातील जागा एनडीए आघाडीला गेली तरी आघाडीच्या उमेदवाराला प्रचंड मताने विजयी करायचे आहे, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

मुख्यमंत्री सावंत यांनी यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा दाखल देत शिवरायांनी अठरा पगड जातीच्या लोकांना एकत्र घेऊन स्वराज्य उभारले. शिवरायांनंतर अठरा पगड जातीचा कोणी विचार केला असेल तर ते पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पीएम विश्वकर्मा योजनेंतर्गत केल्याचा उल्लेख त्यांनी यावेळी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Water Rafting Goa: पावसाळ्यात गोव्यात जाताय? सत्तरीत व्हाईट-वॉटर राफ्टिंगला झालीये सुरूवात; अधिक माहितीसाठी येथे क्लीक करा

Marathi Schools Goa: 'पालकांमुळे बंद पडल्या गोव्यातील मराठी शाळा'; शिक्षणमंत्री प्रमोद सावंत

Goa News Live Updates: पणजी भारतातील सर्वात स्वच्छ शहरांपैकी एक

Rishabh Pant Record: ऋषभ पंतने 'कॅप्टन कूल'चा रेकॉर्ड मोडला! आता क्रिकेटच्या देवाचा नंबर! करणार 'ही' मोठी कामगिरी

WWE सुपरस्टारची गोळ्या घालून निर्घृण हत्या, 18 वर्षांची कारकीर्द एका क्षणात संपली

SCROLL FOR NEXT