CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

CM Pramod Sawant : ...तेव्हाच गोव्याचा मंत्रिमंडळ विस्तार होणार

काँग्रेसच्या आमदारांनी तीन मंत्रिपदं मागितली असल्याची माहिती आहे. मात्र आता मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

CM Pramod Sawant : गोव्यात काँग्रेसच्या आठ आमदारांनी गट स्थापन करुन भाजपमध्ये विलीन केला आहे. यानंतर गोव्याच्या मंत्रिमंडळात फेरबदल केले जाणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. काँग्रेसच्या आमदारांनी तीन मंत्रिपदं मागितली असल्याची माहिती आहे. मात्र आता मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

गोव्यात भाजपमध्ये दाखल झालेले काँग्रेसचे आठही आमदार आधी जाऊन दिल्लीत पक्षश्रेष्ठींची भेट घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष जे पी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय घेतला जाणार असल्याचं मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केलं आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मंत्रिमंडळ विस्ताराचा विषय दिल्ली दरबारी मांडल्याने आता पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात आणि कुणाची मंत्रिपदी वर्णी लागते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

भाजपने काँग्रेसच्या आठ आमदारांना पक्षप्रवेश देऊन आपल्या आमदारांची संख्या 28 वर नेली असली तरी काँग्रेसमधून आलेल्या या आठ जणांना योग्य ते बक्षीस द्यावेच लागणार आहे. यासाठी मंत्रिमंडळात लवकरच बदल केले जाणार असून या बंडखोरांची तीन मंत्रिपदांची मागणी आहे.

मात्र, मंत्रिमंडळाच्या मर्यादेनुसार विद्यमान मंत्रिमंडळातील तितक्याच मंत्र्यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना यासाठी कसरत करावी लागणार असून त्यांची कसोटी लागणार आहे हे मात्र निश्चित.

विद्यमान बंडखोरांपैकी माजी मंत्री मायकल लोबो, आलेक्स सिक्वेरा आणि अन्य एकाला मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळण्याची शक्यता आहे. यासाठी मंत्रिमंडळातून तीन मंत्र्यांना कमी करावे लागणार आहे. यात सहकारमंत्री सुभाष शिरोडकर, पर्यटन मंत्री रोहन खंवटे, मच्छीमार मंत्री नीळकंठ हर्ळणकर किंवा कृषिमंत्री रवी नाईक यांचा नंबर लागू शकतो. यापैकी रवी नाईक हे भंडारी समाजाचे नेते असले तरी त्यांची प्रकृती नाजूक बनली आहे. रोहन खंवटे यांच्या विरोधात काँग्रेसच्या गिरीश चोडणकरांनी मोहीम उघडली आहे. त्यामुळे कोणत्या मंत्र्यांना वगळण्यात येईल, यावर राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mangal Gochar 2026: नोकरी आणि व्यवसायात होणार पैशांचा महापूर! मंगळाचे रोहिणी नक्षत्रात गोचर; 24 जुलैपर्यंतचा काळ 'या' राशींसाठी ठरणार वरदान

New Education Policy: नवा आराखडा, नवी पुस्तके! नवीन शैक्षणिक धोरणाने बदलले देशातील शिक्षणाचे चित्र

Calangute Crime News: कळंगुटमध्ये क्राईम ब्रँचची मोठी कारवाई! देहविक्री रॅकेटचा पर्दाफाश, तेलंगणाच्या एकाला अटक तर पीडित महिलेची सुटका

Income Tax New Rules: आयकर भरण्याची कटकट संपली! करदात्यांना सरकारकडून सर्वात मोठी भेट; ITR-1 चा बदलला नियम

Retirement Life: निवृत्ती म्हणजे शेवट नव्हे, नवी सुरुवात! अपूर्ण राहिलेल्या इच्छा पूर्ण करण्याची सुवर्णसंधी

SCROLL FOR NEXT