Goa CM Receive Maha Kumbh Mela 2025 Invitation Goa CM X Handle
गोवा

Maha Kumbh Mela 2025: प्रयागराज कुंभमेळ्याचे गोव्याचे CM प्रमोद सावंत यांना आमंत्रण; युपीच्या मंत्र्यांनी घेतली भेट

Prayagraj Maha Kumbh Mela 2025: प्रयागराज येथे होणारा महाकुंभ येत्या 13 जानेवारीपासून सुरू होणार असून, 26 फेब्रुवारी 2025 रोजी संमाप्त होईल.

Pramod Yadav

Prayagraj Maha Kumbh Mela 2025

पणजी: प्रयागराज, उत्तर प्रदेश येथे होणाऱ्या महाकुंभमेळ्याचे आमंत्रण गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना देण्यात आले आहे. उत्तर प्रदेशचे मंत्री दारासिंग चौहान व राज्यमंत्री रामकेश निषद यांनी मुख्यमंत्री सावंत यांची भेट घेऊन कुंभमेळ्याची आमंत्रण पत्रिका सूपूर्द केली.

उत्तर प्रदेशचे मंत्री दारासिंग चौहान व राज्यमंत्री रामकेश निषद यांनी आल्तिन पणजी येथे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट घेऊन कुंभमेळ्याचे आमंत्रण दिले. 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी 2025 या काळात त्रिवेणी संगम प्रयागराज येथे होणाऱ्या कुंभमेळ्याला हजर राहण्याची विनंती यावेळी मंत्र्यांनी सावंत यांना केली. मुख्यमंत्री सावंत यांनी या आमंत्रणाची माहिती एक्सवरुन दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नामुळे महाकुंभमेळाला युनेस्कोकडून 'मानवता जपणारा सांस्कृतिक वारसा उत्सव' म्हणून मान्यता मिळाली आहे, असे मुख्यमंत्री सावंत यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. महाकुंभमेळा हा धार्मिक व आध्यात्मिक उत्सव असल्याचेही सावंत म्हणाले.

महाकुंभमेळा काय आहे? What is Maha Kumbh Mela?

महाकुंभमेळा दर 12 वर्षांनंतर आयोजित केला जातो. कुंभमेळ्यात साधू, नागांपासून ते देश-विदेशातील लाखो लोक येतात आणि स्नान करतात.

देशातील फक्त चार पवित्र नद्या आणि चार तीर्थक्षेत्रांवर कुंभमेळा आयोजित केला जातो. प्रयागराज येथील संगम, हरिद्वारमधील गंगा नदी, उज्जैनमधील शिप्रा आणि नाशिक मधील गोदावरी येथे या महाकुंभाचे आयोजन केले जाते.

महाकुंभमेळ्याचे महत्व काय? Importance

महाकुंभाच्या वेळी पवित्र नदीत स्नान केल्याने मनुष्य सर्व प्रकारच्या रोगांपासून, दोषांपासून मुक्त होतो. पापांना मुक्ती मिळते आणि मोक्ष प्राप्त होतो, अशी मान्यता आहे.

2025 साली होणारा महाकुंभ येत्या 13 जानेवारीपासून सुरू होणार असून, 26 फेब्रुवारी 2025 रोजी संमाप्त होईल. हिंदू कॅलेंडरनुसार, पौष पौर्णिमेच्या दिवशी महाकुंभ सुरू होईल आणि ४५ दिवसानंतर महाशिवरात्रीला समाप्त होईल.

महाकुंभ 2025 मधील शाही स्नानाच्या महत्त्वाच्या तारखा (Dates of Royal Bath)

13 जानेवारी 2025- पौष पौर्णिमा स्नान

14 जानेवारी 2025- मकर संक्रांती

29 जानेवारी 2025- मौनी अमावस्या

3 फेब्रुवारी 2025- वसंत पंचमी

12 फेब्रुवारी 2025- माघी पौर्णिमा

26 फेब्रुवारी 2025- महाशिवरात्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa ITI: ‘आयटीआय’ करणाऱ्यांसाठी खूशखबर! 2 वर्षांच्‍या कोर्सनंतर मिळणार दहावी, बारावी उत्तीर्ण प्रमाणपत्र; मुख्‍यमंत्र्यांची घोषणा

Vishwajit Rane: ..तर वेगळा 'गोवा' पाहायला मिळेल! आरोग्यमंत्री राणेंचे स्वच्छता अभियान; पणजी बसस्‍थानकावर केली साफसफाई

Goa Rain: सांगितला पाऊस, पडले 'कडकडीत' ऊन! ‘यलो अलर्ट’ घेतला मागे; 4 दिवस मध्यम पावसाची शक्यता

Goa Live Updates: दुचाकीस्वारावर झाड कोसळले

Ramen Health Risks: नूडल्स वाढवतात अकाली मृत्यूचा धोका? जपान विद्यापीठांच्या नव्या अभ्यासात धक्कादायक माहिती उघड

SCROLL FOR NEXT