CM Pramod Sawant And Goa Congress Media Cell Chairman Amarnath Panjikar 
गोवा

CM सावंत अपरिपक्व त्यांनी पुस्तकातून हिंदू धर्म समजून घ्यावा, इंडिया आघाडीवरील टीकेवरुन गोवा काँग्रेसचा हल्लाबोल

संघाच्या शाखेत शिकलेल्या मुख्यमंत्री सावंताना हिंदू धर्म कसा कळेल? - अमरनाथ पणजीकर

Pramod Yadav

CM Pramod Sawant And Goa Congress: 'अपरिपक्व व बालीश मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतानी योग्य पुस्तके वाचून हिंदू धर्म समजून घ्यावा. स्वयंघोषीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राजकीय पंडितांकडून हिंदू धर्म त्यांना कदापी कळणार नाही.' असा टोला कॉंग्रेसचे माध्यम विभाग प्रमुख अमरनाथ पणजीकर यांनी लगावला आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतानी इंदूर येथे इंडिया आघाडीवर केलेल्या वक्तव्याचा पणजीकर यांनी समाचार घेतला. भाजपने कितीही धडपड केली तरी 'जुडेगा भारत, जितेगा इंडिया' हेच सत्य असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

'हिंदू धर्म ही कोणत्याही एका राजकीय पक्षाची, नेत्याची जहागीर अथवा खाजगी मालमत्ता नाही. हिंदू हा सनातन धर्म आहे जो आम्हीही आमच्या खाजगी जीवनात तितक्याच तन्मयतेने पाळतो. आमच्याही दैनंदिन जीवनात देव, धर्म व्रतवैकल्ये आहेत हे मुख्यमंत्र्यांनी समजून घ्यावे.' असे वक्तव्य अमरनाथ पणजीकर यांनी केले.

'सरकारी खर्चाने कोणत्यातरी मंदिरात जाऊन पूजा पाठ करणे हे देवालाही आवडणारे नाही. त्यामुळे राज्याच्या संविधानात्मक पदावर असलेल्या मुख्यमंत्र्यांनी जबाबदारीने बोलले पाहिजे. इंडिया ही आघाडी आहे. तो राजकीय पक्ष नाही. तसेच, इंडिया आघाडीतील बहुतांश नेते, कार्यकर्ते हिंदू धर्मातील असून धर्म रक्षणात त्यांचाही मोठा वाटा आहे. डॉ. सावंतानी बालीश वक्तव्य करुन आपले हसे करुन घेतले आहे.' असे अमरनाथ पणजीकर यांनी म्हटले आहे.

'गोव्यातील हिंदूचा सर्वात मोठा सण आठवड्यावर येवून टेकला आहे. गोव्यातील गरीब व गरजवंत जनता समाजकल्याण खात्याच्या अर्थसहाय्याच्या प्रतिक्षेत आहे. 320 कोटीची थकबाकी सरकारने आता तरी लोकांना द्यावी.'

'हिंदू धर्म म्हणजे केवळ पोकळ आश्वासने देणे नसून, अडलेल्या नडलेल्यांना मदतीचा हात देणे हिच हिंदू धर्माची शिकवण आहे हे मुख्यमंत्र्यानी ध्यानात ठेवावे.' असे अमरनाथ पणजीकर यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT