मध्य प्रदेशातील भाजपची इंदूरची विभागीय जनआशीर्वाद यात्रा सोमवारी बरवानी जिल्ह्यातील जुलवानिया येथे दाखल झाली. या यात्रेत सहभागी होण्यासाठी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी देखील हजेरी लावली होती. याशिवाय खरगोन, बरवानी आणि परिसरातील भाजपचे अनेक ज्येष्ठ नेतेही यात्रेसाठी दाखल झाले.
जुलवानिया येथील यात्रेत राज्याचे पशुसंवर्धन मंत्री प्रेमसिंग पटेल यांनी जनआशीर्वाद यात्रेच्या व्यासपीठावरून उपस्थितांना संबोधित केले. यावेळी भाषण करताना मंत्री पटेल यांची जीभ घसरली, याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, लोक मंत्री पटेल यांची खिल्ली उडवत आहेत.
भाषणादरम्यान पशुसंवर्धन मंत्री प्रेमसिंग पटेल यांनी जनआशीर्वाद यात्रेत सहभागी होण्यासाठी आलेल्या गोव्याच्या मुख्यमंत्र्यांची व्यासपीठावरून ओळख करून दिली. पण, पटेल यांनी मुख्यमंत्री सावंत यांचा गोव्याचे नव्हे तर गुजरात राज्याचे मंत्री म्हणून परिचय करुन दिला.
पटेल यांच्या या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत देखील स्मितहास्य करताना दिसत असून, सभेत बसलेले लोक देखील यावेळी गोंगाट करताना दिसत आहेत. सध्या हा व्हिडिओ सोश मिडियावर व्हायरल होत आहे. अमर उजाला वृत्तपत्राने याबाबत व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे.
यावेळी मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांनी देखील जाहीर सभेत त्यांचे मनोगत व्यक्त केले. विरोधकांच्या युतीचे नाव बदलले आहे, लवकरच राहुल गांधी देखील नाव बदलतील पण त्यामुळे ते जिंकतील का? नाव बदलल्याने हेतू आणि धोरण बदलत नाही. अशा शब्दात सावंत यांनी विरोधकांवर टीका केली.
कमळ जिंकवून जुलवानिया कार्यकर्त्यांनी भोपाळला पाठवले तर मी सर्वांना गोव्याची रेल्वे तिकिटे देईन. मध्य प्रदेशात भाजप सरकार स्थापन करण्याची जबाबदारी तुमची आहे. फक्त दिशाभूल करणाऱ्या कोणाच्याही वक्तव्याला बळी पडू नका. असेही मुख्यमंत्री सावंत यावेळी म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.