Pramod Sawant meets Natarajan Chandrasekaran Dainik Gomantak
गोवा

मुख्यमंत्री सावंतांनी घेतली टाटा सन्स समुहाच्या अध्यक्षांची भेट

गोव्यात उद्योग विकास आणि रोजगार निर्मितीची प्रचंड क्षमता आहे: मुख्यमंत्री सावंत

दैनिक गोमन्तक

पणजी: विकासाच्या दृष्टीने गोव्याला पुढे नेण्यासाठी मुख्यमंत्री प्रमोद सावंत, उद्योगमंत्री माविन गुदिन्हो यांच्यासह मुख्य सचिव पुनीतकुमार गोयल यांनी टाटा सन्स समूहाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन, नोएल टाटा आणि इतर प्रमुख सीईओ यांच्याशी संवाद साधला. (Goa CM Pramod Sawant meets Chairman of Tata Sons Group Natarajan Chandrasekaran)

गोवा स्टेट इंडस्ट्रीज असोसिएशनने एमएसएमईच्या वाढीला चालना देण्यासाठी नवीन उद्योगाला आमंत्रित करण्याच्या स्पष्ट अजेंडासह महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली, असे मुख्यमंत्री कार्यालयाने शनिवारी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. आयटी, विमान वाहतूक, उत्पादन, रिटेल, हॉस्पिटॅलिटी, हॉस्पिटॅलिटीसाठी प्रशिक्षण केंद्रे आणि सॉफ्ट स्किल्स या सर्व क्षेत्रातील संधींवर चर्चा करण्यात आली, असे पत्रकात नमूद केले आहे.

टाटा सन्स समुहाचे अध्यक्ष मुख्यमंत्री आणि उद्योग मंत्र्यांच्या रोजगार निर्मितीच्या सर्वांगीण दृष्टिकोनामुळे प्रभावित झाले आणि त्यांनी गोव्यातील नवीन पिढीच्या व्यवसायांना चालना देण्यासाठी त्यांची सीईओंसोबत त्वरित अंतर्गत बैठकीचे नियोजन करण्याचे आश्वासन दिले, अशी माहिती समोर आली आहे.

गोव्यात उद्योग विकास आणि रोजगार निर्मितीची प्रचंड क्षमता असल्याचे सांगून मुख्यमंत्री सावंत यांनी टाटा सन्ससारख्या उद्योग समूहाचे सहकार्य आणि गुंतवणूक गोव्यासाठी मोठ्या संधी उपलब्ध करून देईल, असे मत व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Arambol: 'शेतकऱ्यांची रोजीरोटी नष्ट करून कोणता विकास करणार'? पोलिस बंदोबस्तात टॉवर उभारणी; हरमलवासीय संतप्त

Comunidade Law: कोमुनिदाद कायदा दुरुस्तीस आव्हान! स्थगितीची मागणी नाकारली; पुढील सुनावणी 13 नोव्हेंबर रोजी

Unity Mall Goa Controversy: 'पंचायत परवाना मिळेपर्यंत युनिटी मॉलचे काम नाही'! सरकारची न्‍यायालयाला हमी

Goa Jail: कैद्यांच्या जेवणावर होणार 90 ऐवजी 123 रुपये खर्च! दरवाढ लागू; पोषणमान, महागाईचा विचार करून निर्णय

Goa River Marathon: 14 डिसेंबर रोजी रंगणार 'गोवा रिव्हर मॅरेथॉन'! साडेसात हजारांहून जास्त धावपटू होणार सहभागी

SCROLL FOR NEXT