Buggy service started in Goa Dainik Gomantak
गोवा

Goa News: खुशखबर...पणजीत प्रवाशांच्या दिमतीला बग्गी; कदंब महामंडळाचा उपक्रम

तीन महिन्यांत सुरू होणार सेवा; प्रदूषणमु्क्त प्रवासी वाहतूक सेवा

विलास ओहाळ

Buggy Service Started In Goa: पणजीतील रस्त्यांची स्थिती, दररोज शहरात ये-जा करणाऱ्या वाहनांची गर्दी पाहता त्यावर उपाय म्हणून आता कदंब परिवहन महामंडळातर्फे शहरात बग्गी सेवा सुरू करणार आहे.

येत्या दोन-तीन महिन्यांत ही सेवा कार्यान्वित करण्याचा मनोदय असून, त्यासाठी महामंडळाने ई-निविदा काढली आहे.

सुरवातीला प्रायोगिक तत्त्वावर ही सेवा सुरू करण्यासाठी चार बग्गी घेण्यात येणार असल्याची माहिती ‘कदंब’चे महाव्यवस्थापक संजय घाटे यांनी ‘गोमन्तक’ला दिली.

पणजीत दररोज दहा हजारांवर वाहनांची वर्दळ असते. शिवाय १८ जून मार्ग, आत्माराम बोरकर मार्ग किंवा हॉटेल मनोशांती या मार्गांवर ये-जा करण्यासाठी खासगी वाहनांशिवाय पर्याय नाही.

या मार्गांवर बसेस धावत नाहीत. अनेक आस्थापने आणि सरकारी कार्यालयांत कर्मचारी बसस्थानकापासून शहरात चालत ये-जा करतात. त्यामुळे अंतर्गत रस्त्यांवर बग्गी सेवा सुरू झाल्यास प्रवासी आणि कर्मचाऱ्यांना ती उपयुक्त ठरणार आहे.

बग्गी सेवेची खासियत

  1. शहरातील अंतर्गत रस्त्यांवर प्रवाशांसाठी बग्गी सेवा ठरणार उपयुक्त.

  2. इलेक्ट्रिक बॅटरीवर चालणार असल्याने ध्वनी व धूळ प्रदूषणमुक्त सेवा.

  3. बग्गीचा आकार लहान असल्याने शहरातील अरुंद रस्त्यांवर सहज वावर.

  4. अत्यंत कमी पैशांत प्रवाशांना सेवा देण्याचे उद्दिष्ट.

"11 जणांची आसनव्यवस्था असलेल्या चार बग्गी खरेदी करण्यात येणार आहेत. ही सेवा उत्तमरित्या चालली आणि तिला प्रतिसाद लाभला तर त्यांची संख्या वाढविण्याचा, तसेच इतर शहरांतही अशी सेवा सुरू करण्याचा विचार केला जाईल."

संजय घाटे, महाव्यवस्थापक, कदंब महामंडळ.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Mega Project: कारापूर-सर्वण मेगा प्रकल्पावर 2 दिवसांत निर्णय, शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक; अधिकाऱ्यांना कागदपत्रे तपासण्याच्या सूचना

Indian Cricketers Ban: भारतीय क्रिकेटमध्ये आतापर्यंतचा सर्वात मोठा फ्रॉड! अंडर-19 वर्ल्ड कप स्टार अडकला जाळ्यात; 65 खेळाडूंवर बंदी

Goa Accident: गोव्यात अपघातांची धडकी भरवणारी आकडेवारी! 19 महिन्यांत 1107 जणांचा मृत्यू; दिवसाला दोन जीवांचा बळी

Shukra Gochar 2026: वैभव अन् संपत्तीचा कारक बदलणार चाल! शुक्राचे नक्षत्र गोचर 5 राशींसाठी ठरणार वरदान; धनाचा होणार वर्षाव

Madgaon Urban Bank: मडगाव अर्बनच्या ठेवीदारांना पुन्हा धक्का; पैसे मिळण्याची निश्चित तारीखच नाही! 4.20 कोटींच्या वसुलीसाठी 154 खटले

SCROLL FOR NEXT