Anjuna News: आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; केनियातील 5 तरुणींची सुटका

केनियन 2 महिला दलालांना अटक
 Anjuna Police Arrest Of Two Female Kenyan Nationals
Anjuna Police Arrest Of Two Female Kenyan NationalsDainik Gomantak

International Sex Trafficking Racket Busted At Anjuna: केनियातील शिक्षित तरुणींना गोव्यात हॉस्पिटॅलिटी उद्योगात नोकरीचे आमिष दाखवून त्यांची तस्करी करून वेश्‍या व्यवसायात गुंतवणाऱ्या आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेटचा पर्दाफाश हणजूण पोलिसांनी ‘अर्ज’ या एनजीओच्या मदतीने केला.

याप्रकरणी पोलिसांनी पाच तरुणींची सुटका केली, तर दोन केनियन महिला दलालांना अटक केली आहे. या रॅकेटमधील अन्य दलालांचा शोध पोलिस घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केनियातील तरुणींची गोव्यात तस्करी करून त्यांना वेश्‍या व्यवसायात गुंतवणाऱ्या दलालांची माहिती ‘अर्ज’ या एनजीओला मिळाली होती.

त्यानुसार त्याची माहिती हणजूण पोलिसांना देऊन ही कारवाई करण्यात आली. मारिया दोर्कास (वय 28 वर्षे) आणि विल्किस्टा आचेस्टा (वय 22 वर्षे) अशी या महिला दलालांची नावे आहेत.

 Anjuna Police Arrest Of Two Female Kenyan Nationals
ताळगावातील ख्रिस्ती धर्मगुरूचे हिंदू देवतांबद्दल वादग्रस्त वक्तव्य, कायदेशीर कारवाईची मागणी

केनियातही जरब बसवणार

हणजूण पोलिसांना या रॅकेटसंदर्भात माहिती देताच त्वरित कारवाई केली. त्यामुळे केनियाच्या तरुणींची सुटका झाली तसेच सूत्रधारालाही गजाआड केले. त्यामुळे संघटित महिला तस्करीच्या प्रकाराला आळा बसला.

केनियातून या तरुणींना नोकरी देण्याचे आमिष दाखवून वेश्‍या व्यवसायासाठी तस्करी केली जात असल्याने तेथील दलालांविरुद्धही कारवाई होण्याची गरज आहे.

इतर एनजीओंच्या मदतीने ‘अर्ज’ देशात दलालांवर कारवाई करण्यासाठी प्रयत्न करणार आहे, अशी माहिती या एनजीओने दिली.

अखेर सुगावा

महिला तस्करीविरोधात काम करणाऱ्या ‘अर्ज’ एनजीओला केनियाच्या तरुणींना बंगळुरू येथे वेश्‍या व्यवसायासाठी दलाल घेऊन जाणार असल्याची माहिती मिळाली होती.

त्यानुसार ‘अर्ज’च्या पदाधिकाऱ्यांनी गोव्यात या तरुणींना डांबून ठेवलेल्या जागेचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यातील एका पीडितेचा शोध घेऊन तिला वाचवले. पीडितेसह ‘अर्ज’तर्फे हणजूण पोलिसांत तक्रार दाखल केली.

 Anjuna Police Arrest Of Two Female Kenyan Nationals
Goa ST Reservation: आदिवासी नेत्यांचे मनोमीलन; बंद दाराआड चर्चा

अशी होती मोडस ऑपरेंडी

  1. केनियातील तरुणींना नोकरीच्या नावाखाली दलालांमार्फत गोव्यात पाठवण्यात येत होते.

  2. या तरुणींचे भारतात येण्यासाठीचे सर्व दस्तावेज व प्रवासाचा खर्च दलाल करत होते.

  3. त्या गोव्यात पोचल्यावर त्यांच्याकडील पासपोर्ट, व्हिसा नोकरीच्या निमित्ताने काढून घ्यायचे.

  4. त्यानंतर त्यांना वेश्‍या व्यवसायासाठी दलाल प्रवृत्त करत.

  5. नकार दिला तर दलालांकडून मारहाण केली जात होती.

  6. त्यांच्यावर केलेला खर्च सुमारे ५ ते ८ लाख रुपये वेश्‍या व्यवसायातून वसूल केल्यावरच सुटका केली जाईल, अशी धमकी द्यायचे.

  7. ‘मेसेज रिपब्लिक’ या वेबसाईटवरून मारिया ही महिला हे रॅकेट चालवत होती.

  8. या वेबसाईटवरून ती ग्राहकांना आकर्षित करायची.

  9. ग्राहकांकडून मेसेज आल्यानंतर या तरुणींना ग्राहकांपर्यंत पोचवले जायचे.

"हे रॅकेट सुमारे ५ वर्षे गोव्यात सुरू होते. मात्र हे रॅकेट चालविणारे संशयित वारंवार ठिकाण बदलत असल्याने ते पोलिसांच्या हाती लागत नसत."

"केनिया येथून गोव्यात नोकरीचे आमिष दाखवून गोव्यात आणलेल्या या युवतींना गोवा आणि बंगळूर येथे वेश्या व्यवसायास जुंपले जात असे."

"बंगळुरू येथील एनजीओकडून आम्हाला या रॅकेटची माहिती मिळाल्यावर गोवा पोलिसांच्या साहाय्याने आम्ही त्यांच्यापर्यंत पोचलो."

- अरुण पांडे, संचालक, अर्ज.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com