CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

CM Pramod Sawant: कुमारस्‍वामी भाजपच्‍या गळाला, 'जेडी'च्या ‘एनडीए’तील समावेशाने सावंतांचे राजकीय वजन वाढले

भाजप प्रचार मोहिमांत मुख्यमंत्र्यांचा समावेश केला गेल्याने दिल्लीतील वरिष्ठांची मुख्यमंत्र्यांवर विशेष मर्जी असल्याचे दिसून आले

गोमन्तक डिजिटल टीम

CM Pramod Sawant तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर पक्षाने सोपवलेली मुख्यमंत्री पदाची धुरा यशस्वीपणे सांभाळत आता डॉ. प्रमोद सावंत यांनी राष्ट्रीय पातळीवर राजकारणात महत्त्वपूर्ण मुत्सद्देगिरी केली आहे.

राष्ट्रीय लोकशाही आघाडीत कर्नाटकातील धर्मनिरपेक्ष जनता दलाचा समावेश करून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिल्ली दरबारातील आपले राजकीय वजन वाढवले आहे.

छत्तीसगड आणि मध्य प्रदेशातील भाजप प्रचार मोहिमांत मुख्यमंत्र्यांचा समावेश केला गेल्याने दिल्लीतील वरिष्ठांची मुख्यमंत्र्यांवर विशेष मर्जी असल्याचे दिसून आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेळोवेळी जाहीरपणे मुख्यमंत्र्यांच्या कामाची प्रशंसा करून भाजपचे नेतृत्व त्यांच्यामागे ठामपणे उभे असल्याचा संदेश दिला होता.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीवेळी भाजपने मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्याकडे काही मतदारसंघांची जबाबदारी दिली होती. तेथे भाजपने सत्ता गमावली आणि या दोन्ही नेत्यांकडे सोपवलेल्या मतदारसंघांतही त्यांना चमकदार कामगिरी करता आली नाही.

याचदरम्यान भाजप विरोधकांत फूट पाडून कॉंग्रेस सत्तेवर येण्यास कारणीभूत ठरलेले धर्मनिरपेक्ष जनता दल हा पक्ष भाजपकडे आणण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी मुख्यमंत्र्यांकडे थेट केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी सोपवली होती. लोकसभा निवडणुकीत कर्नाटकातील सर्व जागा जिंकण्यासाठी हा पक्ष सोबत हवाच, अशी भूमिका घेण्यात आली आहे.

त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या कुटुंबातील तिसऱ्या पिढीशी संवाद साधणे सुरू केले. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांचे पुत्र निखिल कुमारस्वामी यांच्यासोबत त्यांचा अनेकदा संवाद झाला.

देवेगौडा यांना माजी पंतप्रधान या नात्याने दिल्लीत शासकीय निवासस्थान मिळाले आहे. त्या निवासस्थानी मुख्यमंत्र्यांसोबत निखिल यांच्या चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या. त्यात प्रामुख्याने लोकसभेसाठीचे जागा वाटप आणि केंद्रातील सत्तेतील वाटा, हा विषय चर्चेला होता.

या साऱ्यावर पक्ष नेतृत्वाशी चर्चा करून मुख्यमंत्र्यांनी मार्ग काढला आहे. त्याचा तपशील अद्याप जाहीर केला नसला तरी केंद्रातील एखादे मंत्रिपद धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या कर्नाटकातील नेत्याला मिळू शकते, अशी अटकळ आहे.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना कर्नाटकातील शाल भेट देऊन कुमारस्वामी यांनी आज आघाडीत प्रवेश केला.

यावेळी मुख्यमंत्री डॉ. सावंत हेही उपस्थित होते. मुख्यमंत्री यानंतर राजस्थानमधील भाजपच्या विधानसभा व लोकसभा निवडणूकपूर्व प्रचारात सहभागी होणार आहेत.

‘मिशन कर्नाटक’ सुरू

कर्नाटकात सध्या कॉंग्रेसचे सरकार आहे. लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान किंवा त्यानंतर लगेच त्या सरकारऐवजी कर्नाटकात भाजपचे सरकार सत्तेवर आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. मागील निवडणुकीत भाजपला ६६, तर धजदला १९ जागा मिळाल्या.

२२४ जागांच्या विधानसभेत सत्तेसाठी ११२ आमदार असणे गरजेचे आहे. भाजप व धजद एकत्र आले तरी त्यांना आणखी २७ आमदारांची गरज भासणार आहे. कुमारस्वामी यांना भाजपसोबत सरकार चालवण्याचा जानेवारी २००६ पासून २० महिन्यांचा अनुभव आहे.

...अशी झाली खलबते

दिल्लीत गुरुवारी रात्री माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट झाली. त्यात अंतिम निर्णय घेण्‍यात आला. त्यापूर्वी झालेल्या बैठकीत देवेगौडा यांचे नातू निखिल कुमारस्वामी आणि प्रज्वल रेवण्णा हे सहभागी झाले होते. कुमारस्वामी यांचे बंधू एच. डी. रेवण्णा यांचीही या आघाडीला संमती आहे.

राणेंची ‘दाबोळी’संदर्भात चर्चा

आरोग्यमंत्री विश्वजीत राणे हेही शुक्रवारी दिल्लीत होते. त्यांनी संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांची भेट घेतली. त्यांनी ‘ट्विटर’वर दिलेल्या माहितीनुसार, दाबोळी विमानतळाच्या बफर झोनविषयी इतर अनेक विषयांसोबत सकारात्मक चर्चा केली.

राणे त्यानंतर भाजपच्या संघटनात्मक कामासाठी दिल्लीहून मध्य प्रदेशकडे रवाना झाले. विमानतळापासून चारशे मीटर परिघात बांधकामे करण्यास नौदलाकडून परवानगी दिली जात नाही. ती मर्यादा ५० मीटरवर आणावी, अशी मागणी आहे. देशाच्या इतर भागांत ती ५० मीटरच मर्यादा आहे, याकडे यापूर्वी संरक्षणमंत्र्यांचे पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांनी लक्ष वेधले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT