CM Pramod Sawant  Dainik Gomantak
गोवा

CM Pramod Sawant: धार्मिक भावना दुखावल्यास कडक कारवाई : मुख्यमंत्री

तत्काळ अटकेची कारवाई व्हावी : मंत्री काब्राल यांचे मत

दैनिक गोमन्तक

Goa CM Pramod Sawant Issues Warning: राज्यात यापुढे कोणीही कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न केला, तर सरकार कडक कारवाई करेल, असा इशारा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पुन्हा दिला.

मुख्यमंत्री केवळ इशारा देऊनच थांबले, तर सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल यांनी धार्मिक भावना दुखावणाऱ्याला तत्काळ अटक केली पाहिजे, असे मत व्यक्त केले.

राज्य मंत्रिमंडळ बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेवेळी सध्या व्हायरल झालेल्या व्हिडिओकडे पत्रकारांनी लक्ष वेधले असता मुख्यमंत्री म्हणाले, "कोणीच कोणाच्या धर्मावर टीका करू नये. कोणी कोणत्या देवाला मानावे, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक विषय आहे."

"त्यामुळे हिंदू किंवा ख्रिस्ती यांनी एक दुसऱ्याच्या धर्माविषयी बोलू नये. यापुढे जर कोणी कुठेही आक्षेपार्ह विधान केले आणि लोकांच्या भावना दुखावल्या, तर सरकार कारवाई करेल."

यापूर्वीही मुख्यमंत्र्यांनी यापुढे असा प्रकार घडला तर सरकार कारवाई करेल, असा इशारा फादर बोलमॅक्स परेरा प्रकरण उदभवल्यानंतर दिला होता.

त्यानंतर आता ताळगाव येथील एका ख्रिस्ती धर्मगुरूने हिंदूंच्या देवांबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याचे प्रकरण गाजत आहे. तरीही मुख्यमंत्री केवळ इशारा देऊन थांबले आहेत.

टीकेसाठी धर्मपीठांचा वापर नको

मंत्री काब्राल यांनी सांगितले की, दुसऱ्याच्या धर्मावर कोणी कुठेही बोलले, तर ते चूकच आहे. दुसऱ्याच्या धर्मावर बोलण्याचा कोणालाही अधिकार नाही. अशा व्यक्तीला अटक झाली पाहिजे.

मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी कडक कारवाई करण्याची घेतलेली भूमिका योग्य आहे. धर्मपीठाचा वापर दुसऱ्या धर्मावर टीका करण्यासाठी अजिबात होऊ नये.

ख्रिस्ती धर्मगुरूंचे विधान आक्षेपार्ह

ताळगाव येथील एका ख्रिस्ती धर्मगुरूने चर्चमध्ये प्रवचन देताना हिंदू धर्मियांच्या देवांविषयी काही आक्षेपार्ह उद्गगार काढल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.

यापूर्वी फादर बोलमॅक्स परेरा यांना अशा कथित वक्तव्यामुळे अटकपूर्व जामीन मिळवावा लागला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: आमदार भाजपमध्ये जाणार नाहीत याची गॅरंटी द्या! ‘आप’चा काँग्रेससोबत युतीस स्पष्ट नकार

Shubhman Gill: "त्यांनी भारताला स्वबळावर अनेक सामने जिंकून दिले, आम्हाला त्यांची गरज..." नवा कर्णधार शुभमन गिलचे रोहित-विराटबाबत मोठं वक्तव्य

IND vs WI 2nd Test: टीम इंडियाला धक्का, दिल्ली कसोटीत जसप्रीत बुमराहच्या खेळण्यावर सस्पेन्स, 'या' खेळाडूला संधी मिळू शकते

Goa Live News: गोव्यात बरसणार मुसळधार सरी, हवामान विभागाकडून इशारा जारी

Dengue Shock Syndrome: काय आहे डेंग्यू शॉक सिंड्रोम? कसा बनतो मृत्यूचं कारण? दुर्लक्ष करणं पडू शकत महागात; जाणून घ्या लक्षणे आणि बचावात्मक उपाय

SCROLL FOR NEXT