Goa Police: 32 निलंबितांमध्ये 14 पोलिसांचा समावेश; अनेकांचे कारनामे आले चव्‍हाट्यावर

निलंबित पोलिसांची यादी शिपायांपासून उपमहानिरीक्षकांपर्यंत लांबली आहे.
Goa Police
Goa PoliceDainik Gomantak

कुंकळ्‍ळीचे पोलिस निरीक्षक तुकाराम चव्‍हाण यांना निलंबित करण्‍याचा, तर म्‍हार्दोळचे पोलिस निरीक्षक मोहन गावडे यांची चौकशी सुरू करण्‍याचा आदेश पोलिस महासंचालक जसपाल सिंग यांच्‍या कार्यालयातून काढल्‍याने खाकी वर्दीवरील या काळ्‍या डागांसंदर्भात लाेकांमध्‍ये पुन्‍हा चर्चा सुरू झाली आहे.

यंदा जानेवारीपासून आतापर्यंत वेगवेगळ्‍या कारणांसाठी ३२ कर्मचारी निलंबित झाले असून त्‍यात 14 पोलिसांचा समावेश आहे. निलंबित पोलिसांची यादी शिपायांपासून उपमहानिरीक्षकांपर्यंत लांबली आहे. त्‍यामुळे लाेकांचा खाकी वर्दीवरील विश्‍वास उडू लागला आहे.

Goa Police
Watch Video: आंध्र प्रदेशात मध्यरात्री रंगलं अटकनाट्य, माजी मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू सीआयडीकडून ताब्यात

निरीक्षक चव्‍हाण यांनी काही व्‍यावसायिकांकडून मुख्‍यमंत्र्यांच्‍या नावे लाच मागितल्‍याचा आरोप ‘आप’चे नेते संदेश तेलेकर यांनी केला असून गावडे यांच्‍या विरोधात बाणस्‍तारी अपघात प्रकरणात आरोपींना मोकळे सोडले, असा आरोप आहे.

यातील सर्वांत गाजलेले प्रकरण म्हणजे, उपमहानिरीक्षक डॉ. ए. कोन यांचे निलंबन. बागा येथील एका हाॅटेलमध्‍ये मद्यधुंद अवस्‍थेत असताना एका महिलेकडे गैरवर्तन केल्‍याचा त्‍यांच्‍यावर आरोप होता.

अशीच दुसरी घटना ६ सप्‍टेंबर रोजी घडली. महिलेच्या विनयभंगप्रकरणी सूरज सक्‍सेना या आयआरबी शिपायाला अटक करून निलंबित केले. सध्‍या विद्यापीठातील दोन विद्यार्थिनींचा विनयभंग केल्‍याच्या आरोपामुळे एका उपअधीक्षकाची चौकशी सुरू आहे.

Goa Police
Anjuna News: आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; केनियातील 5 तरुणींची सुटका

एकूण निलंबित सरकारी कर्मचारी - 32

पोलिस - १४

अबकारी - ०३

विमानतळ प्राधिकरण - ०३

डॉक्‍टर - ०२

परिचारिका - ०२

शिक्षक - ०२

पालिका कर्मचारी - ०२

पोस्‍ट - ०१

सरकारी छापखाना - ०१

नगरनियोजन खाते - ०१

माहिती खाते - ०१

निलंबनाची 'ही' आहेत कारणे

यापूर्वी जे पोलिस निलंबित झाले आहेत, त्‍यापैकी एकाचा खुनात सहभाग असल्‍याने त्‍याला निलंबित केले आहे. पाचजणांना लाच घेतल्‍याच्‍या आरोपावरून निलंबित केले.

दोघांना वेळेत गुन्‍हा नोंद न केल्‍यामुळे, दोघांना एका वयस्‍कर जोडप्‍याची सतावणूक केल्‍यामुळे, दोघांना महिलांची छेड काढल्‍यामुळे तर दोघांना आरोपी पळून गेल्‍यामुळे निलंबित केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com